Nagpur: पतीपासून वेगळं राहत असलेल्या शिक्षिकेसोबत धक्कादायक कृत्य, नागपूर येथील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur: पतीपासून वेगळं राहत असलेल्या शिक्षिकेसोबत धक्कादायक कृत्य, नागपूर येथील घटना

Nagpur: पतीपासून वेगळं राहत असलेल्या शिक्षिकेसोबत धक्कादायक कृत्य, नागपूर येथील घटना

Oct 08, 2024 10:45 AM IST

Nagpur School Teacher molested: नागपूरमध्ये पतीपासून वेगळं राहत असलेल्या शिक्षिकेचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली.

पतीपासून वेगळं राहत असलेल्या शिक्षिकेसोबत धक्कादायक कृत्य
पतीपासून वेगळं राहत असलेल्या शिक्षिकेसोबत धक्कादायक कृत्य

Nagpur News: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर पावली उचलली जात असताना नागपूर येथून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. नागपूर जिल्ह्यातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या शिक्षकेचा घरात घुसून विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी शिक्षिकेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळाळेल्या माहितीनुसार, अमोल रवींद्र पारवे (वय, ४१) असे आरोपीचे नाव असून तो नझुल ले आऊट येथील रहिवासी आहे. तर, ३६ वर्षीय पीडित शिक्षिका जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. शिक्षिका आणि आरोपी एकमेकांना ओळखत असल्याची माहिती समोर येत आहे. शिक्षिका गेल्या आठ महिन्यापासून पतीपासून वेगळी राहते, याची माहिती आरोपी होती. दरम्यान, मार्च महिन्यात आरोपी शिक्षिकेचा घरी गेला आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर शिक्षिकेने अमोलविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांत तक्रार केल्याने अमोलच्या मनात शिक्षिकेविरुद्ध राग होता. दरम्यान, रविवारी सायंकाळी अमोल पुन्हा शिक्षिकेच्या घरात घुसला आणि तिचा विनयभंग केला. तसेच पोलीस तक्रार का दिली, असे म्हणत शिक्षिकेला ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अनेकवेळा बलात्कार

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर दोन महिन्यांत अनेकवेळा बलात्कार केल्याप्रकरणी एका २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल प्रजापती (वय, २१) याला रविवारी (८ ऑक्टोबर २०२४) रात्री उशिरा भदोही रेल्वे स्थानकातून रेल्वेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक करण्यात आली.

पोलीस अधीक्षक मीनाक्षी कात्यायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतवाली परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने २० ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती की, त्याची बहीण ३० जुलै रोजी सायंकाळी घराबाहेर पडल्यानंतर घरी परतली नाही. तिचा शोध घेतल्यानंतर ती प्रजापतीसोबत शेवटची दिसली. यानंतर प्रजापतीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.

रविवारी मिळालेल्या माहितीच्या आधारे विशालला रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली आणि कसून चौकशी केली असता त्याने मुलीचा ठावठिकाणा पोलिसांना सांगितला. यानंतर पीडित मुलीची सुटका करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता सोमवारी त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. मुलीचा वैद्यकीय अहवाल आणि जबाबाच्या आधारे आरोपीविरुद्ध पोस्को काद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर