मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur: युनिसेक्स सलूनच्या नावाखाली देहव्यापार, एका महिलेची सुटका, नागपूर येथील घटना

Nagpur: युनिसेक्स सलूनच्या नावाखाली देहव्यापार, एका महिलेची सुटका, नागपूर येथील घटना

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 25, 2024 11:26 PM IST

Nagpur Sex Racket Busted: नागपूरमध्ये युनिसेक्स सलूनच्या नावावर देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ माजली.

नागपूरमध्ये सलूनच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला.
नागपूरमध्ये सलूनच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. (HT)

Nagpur Gabru Unisex Salon News: नागपूरमध्ये युनिसेक्स सलूनच्या नावावर देहव्यापार करणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. तर, एका ३० वर्षीय विवाहित महिलेची सुटका केली. आरोपींना लकडगंज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी लकडगंज पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

नितीन पवार (वय, २६) रा. संजय गांधीनगर, नीलम ऊर्फ निशा बनोदे (वय, ३५) अशी आरोपींची नावे आहेत. नितीन पवार हा संगणक दुरुस्तीचे काम करायचा. परंतु, काही दिवसांपूर्वी त्याने नोकरी गमावली. यानंतर त्याने सलूनच्या कामाचे प्रशिक्षण घेतले आणि गबरू युनिसेक्स सलून या नावाने दुकान थाटले. मात्र, काही दिवसाने त्याने नीलम बनोदेच्या मदतीने सलूनच्या आड देहव्यापार सुरु करण्याचा विचार केला.

Mumbai: कारमध्ये आढळले दोन बेपत्ता मुलांचे मृतदेह; मुंबईच्या अँटॉप हिल येथील घटना, पोलीस म्हणाले...

निलमने पीडित महिलेला देहव्यापार करण्यासाठी विचारणा केली. महिलेला पती आणि दोन मुले आहेत. मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि वाढता घर खर्च पूर्ण करण्यासाठी या महिलेला पैशांची गरज होती. नीलमने पीडित महिलेला देहव्यवसाय करण्यासाठी तयार केले.

प्रॉपर्टीसाठी बाप झाला वैरी! मुलाला संपविण्यासाठी दिली लाखोंची सुपारी; जंगली महाराज रस्त्यावरील गोळीबाराचा उलगडा

सापळा रचून आरोपींना अटक

सलून नावाखाली देहव्यापार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून एका बनावट ग्राहकाला सलूनमध्ये पाठवले. तिथे सौदा पक्का होताच ग्राहकाने इशारा केला. यानंतर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सलूनवर धाड टाकली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पीडित महिलेची सुटका केली.

अकोला: कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलीची हत्या

अकोल्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने माहेरी गेलेल्या पत्नीसह मुलीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही घटना आकोल्यातील हनुमानवस्ती परिसरात बुधवारी (२४ एप्रिल २०२४) सकाळी घडली. मनीष म्हात्रे असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी आणि त्याची पत्नी रश्मी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणांवरून सतत वाद होत असे. नेहमीच्या त्रासाला वैतागून रश्मी त्यांच्या ९ वर्षाच्या मुलीला घेऊन नांदेड येथे माहेरी निघून गेली. या दोघीही म्हात्रे कुटुंबातील एका लग्नासाठी अकोल्यात आल्या होत्या, ज्या ठिकाणी ही घटना घडली.

IPL_Entry_Point

विभाग