मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sex Racket : मॉडेलिंगच्या नावाखाली तरुणीकडून देहव्यापार; पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ठोकल्या बेड्या
Sex Racket In Destiny Hotel Manishnagar Nagpur
Sex Racket In Destiny Hotel Manishnagar Nagpur (HT)

Sex Racket : मॉडेलिंगच्या नावाखाली तरुणीकडून देहव्यापार; पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ठोकल्या बेड्या

14 February 2023, 19:59 ISTAtik Sikandar Shaikh

Sex Racket In Nagpur : ग्राहकांकडून आरोपी १० हजार घ्यायचा आणि तरुणीला केवळ १ हजार द्यायचा. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेलवर छापा मारत आरोपी विक्कीच्या कृत्याचा भांडाफोड केला आहे.

Sex Racket In Destiny Hotel Manishnagar Nagpur : मॉडेलिंग करण्याचं स्वप्न उराशी बाळगून घराबाहेर निघालेल्या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. मॉडेलिंगसाठी मदत करण्याचं आश्वासन देत आरोपीनं तरुणीला चक्क देहव्यापारात ढकलल्याची घटना नागपुरातून समोर आली आहे. त्यामुळं आता शहरात खळबळ उडाली असून त्यानंतर आता पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपीला सापळा रचून बेड्या ठोकल्या आहे. काही दिवसांपूर्वीच नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला होता. त्यानंतर आता मॉडेलिंगच्या नावाखाली तरुणीकडून देहव्यापार करण्यात येत असल्याची घटना समोर आल्यानंतर आता नागपुरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आरोपी दलाल विक्की राजू कदमवार याने मध्यप्रदेशातील पांढुर्णा जिल्ह्यातील एका तरुणीला मॉडेलिंगचं आमिष दाखवून आणि दिग्दर्शकांशी ओळख असल्याचं सांगत तिला नागपुरात आणलं. त्यानंतर शहरातील मनिषनगरमधील हॉटेल डेस्टिनीमध्ये तरुणीला ठेवून आरोपी तिच्याकडे शहरातील आंबटशौकिन ग्राहकांना पाठवून देहव्यापार चालवत होता. तरुणीचे अश्लिल व्हिडिओ आणि फोटो शूट करून आरोपी विक्कीनं तिला ब्लॅकमेल केलं त्यामुळं तरुणीनं बदनामीच्या भीतीनं कुणालाच याबाबत सांगितलं नाही. याशिवाय आरोपी ग्राहकांकडून १० हजार घ्यायचा आणि तरुणीला मात्र एक हजारच रुपये देत असल्याचं तपासातून उघड झालं आहे.

असा ठरला तरुणीचा सौदा प्रतिग्राहकांसाठी १० हजार रुपये असा सौदा विक्की ठरवित होता. त्यापैकी तरुणीला एक हजार रुपये देण्यात येत होते तर ९ हजार रुपये विक्की ठेवत होता. परंतु या प्रकरणाची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी आरोपी विक्कीच्या मुसक्या आवळण्यासाठी सापला रचला. गुन्हे शाखेच्या निरीक्षक शुभांगी वानखडे यांनी डेस्टिनी हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून तिथं देहव्यापार सुरू असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर पोलिसांच्या पथकानं थेट हॉटेलवर छापेमारी करत आरोपी विक्कीला अटक केली आहे. याशिवाय पोलिसांनी पीडित तरुणीलाही ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू असल्याचं नागपूर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.