नागपूरच्या कन्हान नदीत एका तरुणीसह ४ जण बुडाले, शोध मोहीम सुरु
Nagpur news : नागपूरच्या कन्हान नदीत पोहण्यासाठी गेलेले चार तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणीचा समावेश आहे.
Nagpur Kanhan River: नागपूरच्या कन्हान नदीत पोहण्यासाठी गेलेले चार तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणीचा समावेश असून नदीत उतरलेल्या दोन तरुणी बचावल्या आहेत. हे तरुण नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले होते, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चार जण बुडाले. ही घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील वाकी येथे घडली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
विजय ठाकरे, सानिया कोल्हे, अंकुश बघेल आणि अर्पित अशी नदीमध्ये बुडालेल्यांची नावं आहेत. नदीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले चार तरुण बुडाल्याच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासनाने बचाव व शोधकार्य सुरू केले. चारही तरुणांचा पाण्यात शोध घेतला जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कन्हान नदी परिसरामध्ये फिरण्यासाठी काही तरुण-तरुणी आले होते. नदीकिनारी फिरल्यानंतर ते सर्वजण नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तीन तरुण आणि एक तरुणी नदीमध्ये बुडाले. तर सुदैवाने दोन तरुणी सुखरुप पाण्याबाहेर आल्या.
बचाव पथकाकडून चारही जणांचा शोध सुरु आहे. या चारही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक ग्रामस्थ,पोलीस आणि एनडीआरएफकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
विभाग