नागपूरमध्ये चार शाळकरी मुलांचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चार मुले पोहण्यासाठी कालव्यात उतरली होती, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागली. त्यांनी आरडाओरडा केला मात्र जवळपास कोणीही नसल्याने त्यांनी मदत मिळू शकली नाही व चौघांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात बोरी गावाजवळ चार शाळकरी मुलं कालव्यात बुडाली आहेत. ही घटना रामटेकमधील घोटीटोक परिसरात घडली. ४ शालेय विद्यार्थ्यांचा कालव्यातून बुडून मृत्यू झाला. सर्व विद्यार्थी इयत्ता सातवी ते ११ वीच्या वर्गात शिकत होती. मृत विद्यार्थी इंदिरा गांधी मुलांच्या वसतीगृहात रहात होते. आज दुपारच्या सुमारास ते कालव्यात पोहोयला गेले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस आणि तहसीलदार पोहचले असून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. या चार जणांचे मृतदेह शोधण्याचे कार्य सुरु आहे.
बोरी गावाजवळ इंदिरा शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील आठ विद्यार्थी आज दुपारी शाळेजवळच्या कालव्यावर पोहायला गेले होते. आठ पैकी चार मुलं पाण्यात उतरले. मात्र त्यांना कालव्यातील पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं ते पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले. अद्याप त्यांचा काहीच पत्ता लागू शकलेला नाही. शोधमोहीम सुरू आहे.
कालव्यात बुडालेले सर्व विद्यार्थी सातवी ते अकरावीच्या वर्गात शिकत होते. चौघेजण पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहेत. चारही मुलांचा शोध सुरू आहे.
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. धाकट्या भावाला पाण्यात बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी थोरल्या भावाने पाण्यात उडी घेतली. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांनाही आपला जीव गमवावा लागला. या घटनेची मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. या घटनेने सालबर्डी गावावर शोककळा पसरली आहे.
वेदांत कृष्णा ढाके (वय, १६) आणि चिराग कृष्णा ढाके (वय, ११) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत आणि चिराग हे दोघेही रविवारी दुपारी केस कापून आल्यानंतर सालबर्डी शिवारातील तलावावर पोहण्यासाठी गेली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने चिराग बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी वेदांतने पाण्यात उडी घेतली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
संबंधित बातम्या