मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur news : चॉकलेटमधून १७ मुलांना विषबाधा, नागपूरच्या मदनगोपाल स्कूलमधल्या मुलांची प्रकृती बिघडली

Nagpur news : चॉकलेटमधून १७ मुलांना विषबाधा, नागपूरच्या मदनगोपाल स्कूलमधल्या मुलांची प्रकृती बिघडली

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 03, 2022 05:11 PM IST

Nagpur news : नागपूर येथील मदनगोपाल स्कूलमधल्या मुलांना अज्ञात व्यक्तीने चॉकलेट दिल्याने ते खाऊन मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

अज्ञाताने दिलेल्या चॉकलेटमधून १७ मुलांना विषबाधा
अज्ञाताने दिलेल्या चॉकलेटमधून १७ मुलांना विषबाधा

नागपूर : येथील मदनगोपाल हायस्कूलमधल्या मुलांना अनोळखी व्यक्तीने चॉकलेट दिले असून ते खाल्ल्याने १७ मुलांना विषबाधा झाली आहे. या मुलांना तातडीने येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.

नागपूर येथील मदनगोपाल विद्यालयात काही विद्यार्थी हे खेळत होते. यावेळी एक काळ्या रंगाची गाडी आली. त्यातील काही व्यक्ती हे मास्क घालून होते. त्यातील काही जणांनी मुलांना चॉकलेट खाण्यास दिले. काही मुलांनी चॉकलेट खाल्ले. यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. अचानक मुलांची प्रकृती बिघडल्याने शाळा प्रशासनाची धावपळ उडाली. सर्व विषबाधा झालेल्या मुलांना तातडीने येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मुलांची प्रकृती स्थिर आहे.

ज्या मुलांनी तब्बल ४ ते ५ चॉकलेट खाल्ले त्यांची प्रकृती ही जास्त बिघडली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. दारम्यान शाळेत सुरक्षा रक्षक असतांना बाहेरची व्यक्ती शाळेत येऊन मुलांना चॉकलेट कशी देऊ शकते असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

पोलिसही दावख्यात आणि शाळेत पोहचले असून त्यांच्याकडून चॉकलेट देणाऱ्या व्यक्तिची माहिती घेतली जात आहे. शाळा परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासण्यात येत आहेत. लवकरच या प्रकरणातील दोशी व्यक्तींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग