Nagpur News: नागपूर हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक घटना घडली. एका तरुणाने विवाहित प्रेयसीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली. महिलेने संबंधास नकार दिल्याने तरुणाने महिलेची हत्या केली. महिलेची मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
रोहित गणेश टेकाम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, मृत महिला ही मूळची मध्य प्रदेशातील असून कामाच्या शोधात सहा वर्षांपूर्वी पतीसह नागपुरात आली. महिलेचा पती एका ढाब्यावर काम करतो. तो सकाळी घराबाहेर पडल्यानंतर मध्यरात्री एक वाजताच परत येतो. आरोपी आणि महिलेची दोन वर्षांपूर्वी हुडकेश्वर खुर्द येथील एका इमारतीच्या बांधकामादरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पती घरी नसताना आरोपी नेहमी तिला भेटायला जात असे.
दरम्यान, गुरुवारी महिलेने आरोपीला घरी भेटायला बोलावले. महिलेला दारूचे व्यसन असल्याने तिने आरोपीला सोबत दारूची बॉटल आणायला सांगितली. यानंतर दोघेही दारु प्यायले आणि जेवले. नंतर आरोपीने महिलेकडे शारिरीक संबंधाची मागणी केली. पण तिने नकार दिला. यामुळे चिडलेल्या आरोपीने तिला मारहाण केली आणि मला घरी कशाला बोलावले, असा प्रश्न केला. पण तरीही तिने संबंधासाठी नकार दिला. रागाच्या भरात आरोपीने ओढणीच्या साहाय्याने तिचा गळा आवळून हत्या केली. एवढ्यावर न थांबता आरोपीने तिच्या मृतदेहावर बलात्कार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. सायंकाळी महिलेची मुलगी शाळेतून घरी परत आल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालात महिलेच्या मृतदेहावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी महिलेचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केली असता त्यानेच महिलेची हत्या करून
नागपूर हुडकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी रोजी एक महिला आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृत महिलेच्या कानातून रक्त निघाल्याचे दिसून आले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्यानंतर समजले की, तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. तसेच तिच्या मृतदेहावर बलात्कार करण्यात आला. मृत महिलेच्या कॉल रेकॉर्डची तपासणी केली असता पोलिसांना एका २५ वर्षीय तरुणावर संशय आला. त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. याप्रकरणी आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या