Viral video : नागपुरात चाललंय काय? जोडप्याचा नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral video : नागपुरात चाललंय काय? जोडप्याचा नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल

Viral video : नागपुरात चाललंय काय? जोडप्याचा नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल

Jul 29, 2024 10:55 AM IST

Nagpur couple nude Viral video : नागपूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका जोडप्याचा नग्न अवस्थेत रस्त्यावरून फिरत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

नागपुरात चाललयं काय ? जोडप्याचा नग्न अवस्थेत फिरतांनाचा व्हिडिओ व्हायरल
नागपुरात चाललयं काय ? जोडप्याचा नग्न अवस्थेत फिरतांनाचा व्हिडिओ व्हायरल

Nagpur couple nude Viral video : राज्याची उपराजधानी नागपूर येथे सध्या नेमकं काय चाललयं ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी कारमध्ये अश्लील कृत्य करतानाचा एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर दुचाकीवर प्रेयसीसोबत अश्लील चाळे करतांना एका गुंडांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटना ताज्या असतांना शनिवारी आणखी एक अशीच घटना उघडकीस आली. एक जोडपं भर रस्त्यात नग्न अवस्थेत फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे जोडपं रस्त्यावर नग्नावस्थेत फिरत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. या जोडप्याचा व्हिडिओ रस्त्यावरून जणाऱ्यांनी आणि दुचाकीस्वारांनी रेकॉर्ड केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओत नग्न पतीच्या मागे नग्न पत्नी धावताना दिसत आहे.

काय आहे नेमकी घटना ?

नागपुर शहरातील उच्चभ्रू वस्ती असणारी लक्ष्मीनगर येथे शनिवारी रात्री दोनच्या सुमारास हा विचित्र प्रकास उघडकीस आला आहे. एक तरुण हा नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरत होता. तर त्या मागे त्याची बायको ही देखील नग्न अवस्थेत पाठीमागे धावत होती. डोंघामध्ये आधी वाद झाला व या वादानंतर आधी तरुण नग्न अवस्थेमध्ये रस्त्यावर निघाला. तर त्यानंतर तरुणी देखील नग्न अवस्थेमध्ये त्याच्या मागे रस्त्यावर फिरत होती. या दोघांचा व्हिडिओ रस्त्यावरील नागरिकांनी शूट केला आहे. तर दुचाकीवरून जाणाऱ्यांनी देखील दोघांचा व्हिडिओ शूट केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओवरून पोलिसांनी या जोडप्याची ओळख पटवली असून, पुढील कारवाई सुरू आहे.

पती पत्नी मनोरुग्ण असल्याचं उघड

या व्हायरल व्हिडीओची पोलिसांनी लगेच दखल घेतली आहे. बजाज नगर पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे या दाम्पत्याचा शोध घेतला. दोघांनी पोलीस ठाण्याला आणण्यात आले होते. त्यांच्या सोबत त्यांचे कुटूंबीय देखील होते. यावेळी दोघेही मानसिक रूग्ण असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी संगितले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. दोघांवर उपचार करा असे पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

कधी कार तर कधी दुचाकीवर अश्लील चाळे

नागपूरमध्ये या पूर्वी दोन घटना व्हायरल झाल्या आहेत. पहिल्या घटनेत एक अट्टल गुंड हा त्याच्या प्रेयसीसोबत धावत्या दुचाकीवर अश्लील चाळे करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर प्रियकर-प्रेयसी धावत्या कारमध्ये अश्लील चाळे करतानांचा देखील व्हिडिओ व्हायरल झालेला. धरमपेठ येथील भागात घडलेल्या या घटनेची पोलिसांनी दखल घेतली व दोघांवर सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर