मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Accident: नागपूरमध्येही पुण्यासारखी घटना! मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवले, तीन वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर

Nagpur Accident: नागपूरमध्येही पुण्यासारखी घटना! मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवले, तीन वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर

May 25, 2024 02:20 PM IST

Nagpur Accident: नागपूरमध्येही पुण्याप्रमाणेच एक घटना घडली आहे. एका मद्यधुंद चालकाने कार चालवत तिघांना उडवले असून यात एका मुलाची प्रकृती गंभीर आहे. जमावाने आरोपीच्या कारची तोडफोड केली.

नागपूरमध्येही पुण्यासारखी घटना! मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवले, तीन वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर
नागपूरमध्येही पुण्यासारखी घटना! मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवले, तीन वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर

Nagpur Accident: पुण्यात भरधाव वेगात आलीशान पोर्श कार चालवत एका अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच नागपूरमध्येही अशीच घटना शुक्रवारी रात्री घडली. एका मद्यधुंद चालकाने भरधाव वेगात तिघांना उडवले. यात तीन वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर झाली आहे. पोलिसांनी आरोपी चालकासह तिघांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत एक महिला आणि तिचा मुलगा जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३०ला झेंडा चौकात घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra SSC 10th Result : प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल लागणार २७ मे रोजी, विद्यार्थी-पालकांची धाकधूक वाढली

एक महिला ही शुक्रवारी झेंडा चौकातून जात होती. यावेळी दारूच्या नशेत असलेल्या कारचालकाने भरधाव वेगात येत त्यांना उडवले. या घटनेत एक व्यक्ति देखील गंभीर जखमी झाला आहे. कारमध्ये असलेले इतर दोघे जन देखील दारूच्या नशेत होते. तर त्यांच्या कारमध्ये दारूच्या बाटल्या देखील आढळल्या आहेत.

Pune Porsche Accident: बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र अगरवाल यांना अटक केल्यावर त्यांच्या बंगल्यावर पुणे पोलिसांचा छापा

अपघातानंतर दोन दोघांनी घटनास्थळावरुन पळ काढला. तर कार चालक हा पळून जात असतांना नागरिकांनी त्याला पकडून चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. यावेळी संतप्त काही नागरिकांनी त्याच्या कारची तोडफोड देखील केली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी चालकासह तिघांना अटक केली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांनी दिली. आरोपीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. एकीकडे पुण्यातील अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असतांना राज्याची उपराजधानी नागपुरात सुद्धा पुण्याच्या घटनेची पुनवरावृत्ती झाली आहे.

पुणे अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेन्द्र अगरवालला अटक

अपघात घडल्यानंतर या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यात सुरेन्द्र अगरवाल याने ड्रायव्हरवर हा गुन्हा स्वत:वर घेण्यासाठी दबाव टाकला होता. या ड्रायव्हरला हा गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. चालकाने दिलेल्या जबाबात याचा खुलासा करण्यात आला होता. आज पहाटे ३ च्या सुमारास सुरेंद्रकुमार अग्रवाल याला पोलिसांनी अटक केली. पुराव्यांशी छेडछाड करण्याचा आणि गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न केल्याने सुरेन्द्र कुमार याला अटक करण्यात आली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग