Nagpur Accident : नागपूर येथे एका सुनेने आपल्या सासऱ्याला ठार मारण्यासाठी सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. सासऱ्याचा अपघातात मृत्यू झाला होता. वरकरणी हे प्रकरण हीट अँड रणचे वाटत होते. मात्र, पोलिस तपासात हा अपघात नसून खून असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
नागपूरचे येथील पुरुषोत्तम पुट्टेवार (वय ८२) यांच्या अपघाताप्रकरणी त्यांची सून अर्चना पुट्टेवारच ही मास्टरमाइंड असल्याचे तपसात पुढे आले आहे. अर्चना हिने पुरुषोत्तम यांच्या हत्येची सुपारी तिचा ड्रायव्हर सार्थक बागडे याच्या माध्यमातून दिली होती. सार्थक बागडेने नीरज नीमजे व सचिन धार्मिक या दोघांना पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघात करून त्यांची हत्या करण्यास सांगितले होते.
पोलिसांनी नीरज निमजे व सचिन धार्मिक या दोघांना अटक केली असून त्यांच्या चौकशीतून हा खुनाचा गुन्हा उघडकीस आला आहे. वाहन चालक सार्थक बागडे हा फरार झाला होता त्याला देखील अटक करण्यात आली आहे तर आरोपी सून अर्चना पोट्टेवारला हीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी यांनी हीट अँड रनचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार सुपारी किलिंगचा असल्याचे उघड झाले आहे.
नागपूर येथील पुरुषोत्तम पुट्टेवार यांना २२ मे रोजी एका भरधाव कारने धडक दिली होती. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा प्रकार हीट अँड रनचा वाटला. या प्रकरणी अजनी पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मात्र, खबऱ्यांकडून पोलिसांना ही हत्या असल्याची माहिती मिळाली. नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने नीरज निमजे व सचिन धार्मिक या दोघांना अटक केली. हे दोघे कार चालवत होते. तर त्यांनीच पुरुषोत्तम पुट्टेवार यांना धडक देऊन त्यांना ठार मारले. दरम्यान या दोघांची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा पुट्टेवार कुटुंबात वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या सार्थक बागडेने त्यांना पुरुषोत्तम यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचे उघड झाले.
ऐवढेच नाही तर अपघातासाठी वापरण्यात आलेली सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्यासाठी व हत्या करण्यासाठी अर्चना पुट्टेवार यांनी लाखो रुपयांची सुपारी देखील दिली. पोलिसांनी अर्चना पुट्टेवार यांना अटक केली तर फरार सार्थक बागडे याला देखील अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी काही आरोपी सहभागी आहेत का? सध्या नागपूर पोलिस व गुन्हे शाखेचे तपास पथक शोध थेट आहेत. पुरुषोत्तम यांची कोट्यवधींची संपत्ती हडप करण्याच्या हेतूने त्यांची हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे.