Nagpur Hit And Run : नागपुरात पुन्हा हिट अँड रन! मद्यधुंद कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडले, दोघे ठार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Hit And Run : नागपुरात पुन्हा हिट अँड रन! मद्यधुंद कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडले, दोघे ठार

Nagpur Hit And Run : नागपुरात पुन्हा हिट अँड रन! मद्यधुंद कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडले, दोघे ठार

Published Jun 17, 2024 12:18 PM IST

Nagpur Hit And Run : नागपुरमध्ये एका वृद्ध नागरिकाची कारने उडवून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतांना एका मद्यधुंद कार चालकाने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले.

नागपुरात पुन्हा हिट अँड रन! मद्यधुंद कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडले, दोघे ठार
नागपुरात पुन्हा हिट अँड रन! मद्यधुंद कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडले, दोघे ठार

Nagpur Hit And Run : पुण्याप्रमाणेच उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये ड्रंक अँड ड्राइवचे प्रकार वाढले आहे. नागपुरात एका कारने वृद्ध व्यक्तीला चिरडल्याची घटना ताजी असतांना रविवारी रात्री एका मद्यधुंद इरटीका कार चालकाने चालकाने फुटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी चौकाजवळ रविवारी रात्री सव्वा बारा हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या कारचालक भूषण लांजेवार याला अटक केली आहे. वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी तो त्याच्या मित्रासोबत गेला होता. तो उमरेड मार्गाकडे जात असतांना लांजेवारचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले व कार थेट फुटपाथवर चढली. या कारखाली तीन महिला, चार मुले व एका पुरुष आला. यात एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका लहान मुलीचा देखील मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी मोठा आक्रोश पाहायला मिळाला. कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वाठोडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने सर्व जखमींना उपचारासाठी दवाखान्यात भरती केले, उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोधमोहीम राबविली व कारचालक भूषण लांजेवार याला अटक केली. या अपघातात आणखी पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वाठोड्याचे ठाणेदार विजय दिघे यांनी दिली.

रस्त्यावर खेळणी विकून मजूर करत होते उदरनिर्वाह

रस्त्याव झोपलेले मजूर हे रस्त्यावर खेळणी विकून उदरनिर्वाह करत होते. यात त्यात महिला-मुलांचादेखील समावेश होता. सर्व मजूर जेवण करून झोपले असतांना काररूपी काळाने त्यांच्यावर घाला घातला दारूच्या नशेत चालकाने फुटपाथवर गाडी चढवली. यावेळी गाडी मागे पुढे करण्याच्या नादात मजुरांचा मृत्यू झाला.

वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेले होते मित्र

हिट अँड रन प्रकरणातील गाडीत सात जण होते. कारचालक भूषण लांजेवार, सौरभ कंडुकर, वंश झाडे, सन्मय पात्रेकर, अथर्व बानाईत, अथर्व मोघरे व ऋषिकेष चौबे अशी सर्वांची नावे आहेत. हे सर्व जण वंश झाडे यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला नागपूरच्या शेरे पंजाब धाब्यावर गेले होते. ही गाडी सौरभ कडुकरच्या मालकीची आहे. तर पार्टी झाल्यावर कार भूषण लांजेवारने चालवायला घेतली. हे सर्व मित्र २० ते २२ वयोगटातील आहेत. दारूच्या नशेत असतांना देखील त्यांनी नागपूरच्या आऊटर रिंग रोड फिरायचे ठरवले. यासाठी त्यांनी गाडी दिघोरी रोड मार्गे वळवली

आरोपींवर कठोर कारवाईचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सोबतच रात्रीची गस्त वाढवून 'ड्रंक अँड ड्राईव्ह'ची मोहीम अधिक तीव्र करावी, असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर