नागपूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना; आकाश बॉम्ब गर्दीत फुटल्याने ११ महिला भाजल्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नागपूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना; आकाश बॉम्ब गर्दीत फुटल्याने ११ महिला भाजल्या

नागपूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना; आकाश बॉम्ब गर्दीत फुटल्याने ११ महिला भाजल्या

Sep 20, 2024 09:14 AM IST

Nagpur umrkhed news : नागपूर जिल्ह्यातील उमरखेड येथे मोठी दुर्घटना घडली. गुरुवारी गणेश विसर्जन मिरवणुकीत आकाश बॉम्ब गर्दीत फुटल्याने ११ महिल्या जखमी झाल्या आहेत.

नागपूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना; आकाश बॉम्ब गर्दीत फुटल्याने ११ महिला भाजल्या
नागपूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना; आकाश बॉम्ब गर्दीत फुटल्याने ११ महिला भाजल्या

Nagpur umrkhed news : राज्यभरात गणपती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. लाडक्या गणरायाला मंगळवारी निरोप देण्यात आला. मात्र, नागपूर जिल्ह्यातील उमरखेड येथे गुरुवारी काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली आहे. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक सुरू असतांना काही जण फटाके फोडत होते. यातील एक आकाश बॉम्ब हा खालीच फुटल्याने मोठा स्फोट झाला. यात ११ महिला भाजल्या. त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. यातील काहींच्या चेहऱ्याला मोठ्या जखमा झाल्या आहेत.

नागपूरमध्ये गुरुवारी रात्री गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. विसर्जन मिरवणुकीत फोडण्यात येणारे आकाशात बॉम्ब हे गर्दीत उभे असलेल्या लोकांच्या अंगावर जाऊन फुटले. यात ११ महिला भाजल्याने जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास इतवारी रोडवरील श्रीकृष्ण मंदिराजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार शिवस्नेह मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक काल काढण्यात आली. यावेळी येथे एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर फटाआकाश बॉम्ब हे आकाशात न जाता खालीच फुटले. यातील काही फटाके हे खाली असलेल्या गर्दीवर पडले व फुटले. यावेळी मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नागरिकांच्या अंगावर काही फटाके फुटल्याने यात ११ महिला भाजल्या. या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला. जखमी महिलांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. यातील सात महिलांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांचावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर इतर चार जखमी महिलांना उमरेड सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

या मिरवणुकीतील ढोल पथकातील काही तरुण-तरुणींच्या अंगावर देखील फटाके फुटले. नेमकं काय झाले हे समजन्याच्या आधीच मोठा गोंधळ उडाला. आकाशातून बॉम्बचा वर्षा झाल्याप्रमाणे आगीच्या ठिणग्या सगळीकडे उडत होत्या.

राज्यात गणेश विसर्जनादरम्यान २१ जणांचा मृत्यू

राज्यात लाडक्या गणरायाला जल्लोषात 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या. दरम्यान, विसर्जन करतांना २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. उत्तर महाराष्ट्रात ९ , विदर्भात ७, तर विरारमध्ये १ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १ तर नगर जिल्ह्यात २ व इंदापूरमध्ये एकाचा बुडून मृत्यू झाला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर