मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur News : धक्कादायक! भटक्या कुत्र्यांनी घेतला जीव, नागपुरात ३ वर्षांच्या चिमूकल्याचा हल्ल्यात मृत्यू

Nagpur News : धक्कादायक! भटक्या कुत्र्यांनी घेतला जीव, नागपुरात ३ वर्षांच्या चिमूकल्याचा हल्ल्यात मृत्यू

May 22, 2024 10:23 AM IST

Boy Died in Dog attack in Nagpur : नागपुर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका ३ वर्षीय चिमूकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

नागपुर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका ३ वर्षीय चिमूकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
नागपुर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एका ३ वर्षीय चिमूकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Boy Died in Dog attack in Nagpur : नागपूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील मौदा येथे भटक्या कुत्र्याने एका तीन वर्षीय मुलावर हल्ला करत त्याच्या शरीराचे लचके तोडले. कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी मौदा शहरातील गणेश नगर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत कोणतीच कारवाई केली जात नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

dry day' on June 4 : चार जूनला 'ड्राय डे'! सरकारच्या निर्णया विरोधात हॉटेल मालक असोसिएशनची उच्च न्यायालयात धाव

वंश अंकुश शहाणे असे कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या तीन वर्षीय मुलाचे नाव आहे. येथील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मौद्यात गेल्या काही दिवसांपासन भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. भटक्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेऊन त्यांना जखमी केले असून या कुत्र्यांची परिसरात दहशत आहे.

SSC Board Result Date : बारावीचा निकाल लागला, दहावीचा कधी लागणार? शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती

मंगळवारी मौदा येथे राहत असळलेय शहाणे यांचा तीन वर्षांचा मुलगा मुलगा वंश शहाणे हा संध्याकाळच्या सुमारास घराबाहेर खेळत होता. यावेळी रस्त्यावर फिरत असलेल्या एका भटक्या कुत्र्याने वंशवर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने वंशच्या मानेवर आणि हातावर चावे घेत त्याच्या शरीराचे लचके तोडले. यात वंश हा गंभीर जखमी झाला. वंशचा ओरडण्याचा आवाज आल्यावर घरातील व्यक्तिनी बाहेर धाव घेत कुत्र्यच्या तावडीतून वंशला सोडवले. त्यांनी तातडीने त्याला मौदा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, कुत्र्याच्या हल्ल्यात उपचारादरम्यान वंशचा मृत्यू झाला.

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर

नागपुरमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी हे भटके कुत्रे नागरिकांवर हल्ले करत आहे. अनेक नागरिक या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्याच्या हल्यात वंशचा मृत्यू झाल्याने. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग