नागपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मौदा तालुक्यामधील शांतीनगर तुमान गावात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. एका घरात तिघांचे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटूंबातील पती, पत्नी आणि मुलाचा मृतांमध्ये समावेश आहे.
अरोली पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. श्रीनिवास इळपुंगटी (वय ५८ वर्षे), पद्मालता इळपुंगटी (वय ५४) आणि मुलगा वेंकट इळपुंगटी (वय २९) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इळपुंगटी कुटूंबाचा राईस मिलचा व्यवसाय आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली कुणी हत्या केली,याचा तपास पोलीस करत आहेत.
मौदा तालुक्यातील शांतीनगर तुमान गावात इळपुंगटी कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून राहत होतं. नेहमी सकाळी लवकर उठणारे हे कुटूंबीय गुरुवारी सकाळी बराच वेळ झाला तरी कोणीच बाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी त्यांना आवाज दिला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता सर्वांना धक्का बसला. घरात पती-पत्नी व त्यांचा २९ वर्षाच्या मुलाचा मृतदेह पडला होता. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली.
संबंधित बातम्या