अंगात भूत असल्याची बतावणी करत भोंदू बाबाकडून आई, मुलगी, मामी आणि आजीवर बलात्कार, अखेर कोर्टानं सुनावली शिक्षा-nagpur crime news bhondu baba sentenced 20 years for raping four women ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अंगात भूत असल्याची बतावणी करत भोंदू बाबाकडून आई, मुलगी, मामी आणि आजीवर बलात्कार, अखेर कोर्टानं सुनावली शिक्षा

अंगात भूत असल्याची बतावणी करत भोंदू बाबाकडून आई, मुलगी, मामी आणि आजीवर बलात्कार, अखेर कोर्टानं सुनावली शिक्षा

Sep 01, 2024 05:29 PM IST

Nagpurcrime news : भोंदूबाबाने एकातरुणीच्या अंगात भूताचा वास असल्याचे सांगून २१ दिवस धार्मिक पूजा करावी लागेल, असे कुटूंबीयांना सांगितले. त्यानंतर पीडित तरुणीसह, तिची आई, आजी व मामीवर बलात्कार केला.

चार महिलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्षाची शिक्षा
चार महिलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्षाची शिक्षा

नागपूरमधून २०२१ मध्ये घडलेल्या एका घटनेत भोंदू बाबाने भूतबाधेची भीती दाखवून काच घरातील चार महिलांवर बलात्कार केला होता. या प्रकरणी पोक्सोच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ.पी.जयस्वाल यांनी नराधम भोंदूबाबाला दोषी ठरवून २० वर्षांचा कारावास ठोठावला आहे. धर्मेंद्र विठोबा निनावे उर्फ दुलेवाले बाबा (वय ५०, रा. अंबेनगर, भांडेवाडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

भोंदूबाबाने एका तरुणीच्या अंगात भूताचा वास असल्याचे सांगून २१ दिवस धार्मिक पूजा करावी लागेल, असे कुटुंबीयांना सांगितले. तसेच तरुणीमुळे अन्य महिलांनाही भूतबाधा झाल्याचे सांगत मुलीची आई, मुलगी, मामी आणि ६० वर्षीय आजीवरही त्याने बलात्कार केला. तंत्र-मंत्राने भूतबाधेपासून सुटकारा करून देण्याचे आमिष दाखवून या महिलांचे वारंवार लैंगिक शोषण केले. भोंदू बाबाने जपळपास अडीच वर्षे या कुटुंबातील महिलांचे लैंगिक शोषण केले. मात्र अखेरच त्याचे बिंग फुटले व पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 

नागपुरातील पारडी पोलिसांनी ९ जानेवारी २०२१ रोजी १७ वर्षीय पीडित तरुणीच्या तक्रारीवरून दुलेवाले बाबाविरुद्ध गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार पीडिता नेहमी आजारी राहात असल्याने कुटुंबीय चिंतीत होते. भोंदू बाबाची पीडितेच्या वडिलांची ओळख होती.त्यांनी मुलीच्या आजारपणाची माहिती दुलेवाले बाबा याला दिली. त्याने सांगितले की, मुलीला भूतबाधा झाली असून त्यासाठी घरात येऊन २१ दिवस तंत्र-मंत्र म्हणत पूजा करावी लागेल.

या पूजेसाठी कुटुंबीय तयार झाले. मात्र पूजा करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबा तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करत होता. त्यानंतरही भूतबाधा दूर झाली नसल्याचे सांगत तिला घरापासून दूर निर्जनस्थळी पूजा करण्याच्या उद्देशाने घेऊन गेला व तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. काही दिवसानंतर मुलीच्या अंगातील भूत तिच्या आईच्या अंगात गेल्याचे सांगून तिच्यावरही बलात्कार केला. त्यानंतर तरुणीच्या मामीला आपल्या जाळ्यात ओढले. पूजा करण्याच्या बहाण्याने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. तरुणी तिची आई आणि मामी यांना भूत काढण्याच्या बहाण्याने त्यांना चंद्रपूर, छत्तीसगड आणि डोंगरगाव येथे घेऊन गेला. तेथे गुंगीचे औषध देऊन रात्रीच्या वेळी तिघींवरही बलात्कार केला. शुद्धीवर येताच तो कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची भीती दाखवत होता. 

प्रकार कसा आला उघडकीस?

नराधमाने कुटूंबातील तीन महिलांचे लैंगिक शोषण करूनही त्याचे मन भरले नाही. त्याने तरुणीच्या ६० वर्षीय आजीवरही पूजा करण्याच्या बहाण्याने तिच्यावरही बलात्कार केला. चौघींवरही बलात्कार केल्यानंतर ही बाब आईला सांगितली. त्यानंतर मामी व आजीलाही विचारणा केली. चौरही महिलांशी शारीरिक संबंध ठेवल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

त्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गोदमले यांनी प्रकरणी गुन्हा दाखल करत भोंदूबाबाला अटक केली. त्याने चौघींवर बलात्कार केल्याचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने दुलेवाला बाबा याला पोक्सो व अत्याचार प्रकरणात २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

विभाग