एका महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह त्याच्या मूळगावी नेला जात होता. पतीच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच पत्नीवर आणखी एक मोठा आघात झाला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ सुत्रे हलवून आरोपींना गजाआड केले आहे. ज्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेला होता, त्या गाडीच्या चालकानेच चोरीचा डाव रचल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रुग्णवाहिका चालक अश्वजित विश्वजित वानखेडे याला अटक करण्यात आली आहे.
सक्करधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमवार क्वार्टर परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे. एका महिलेच्या पतीचे आजारपणामुळे निधन झाले होते. पत्नी पतीचा मृतदेह घेऊन त्यांच्या मूळ गावी गेली होती. नागपूरहून मृतदेह सिर्सी गिरड येथे नेला होता. मात्र अंत्यसंस्कार सुरु असतानाच चोरट्यांनी महिलेचे नागपुरातील घर फोटून जवळपास दोन लाखांचा ऐवज पळवला होता. चोरीचा हा डाव मृतदेह गावी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकानेच रचला होता. रुग्णवाहिका चालकानेच रचला होता. महिला घरी एकटीच रहात असल्याचे पाहून व ती पतीच्या अंत्यसंस्कारासाठी गावी आल्याची माहिती आपल्या मुलाला दिली.
त्यानुसार आरोपीने त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांसह महिला अंत्यसंस्कारासाठी गेलेली असताना चोरी केली. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मालही जप्त करण्यात केला आहे. या प्रकरणी रुग्णवाहिका चालक अश्वजित विश्वजित वानखेडे यालाही पोलिसांनी आरोपी केले आहे.
२५ ऑगस्ट रोजी फिर्यादी महिला पतीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन सिर्सी गिरड या मूळगावी अंत्यसंस्कारासाठी गेली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घर फोडून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. मात्र घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सगळा प्रकार कैद झाला होता. सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली.