मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नागपूर : माता न तू वैरिणी.. लग्नाआधीच अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ रस्त्यावर फेकले

नागपूर : माता न तू वैरिणी.. लग्नाआधीच अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ रस्त्यावर फेकले

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 08, 2024 09:17 PM IST

Nagpur Crime News : लिव इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या तरुणीने बाळाला जन्म दिला मात्र समाजात बदनामी होण्याच्या भीतीने तिने बाळ रस्त्याकडेला टाकून पळ काढला. हा प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

प्रियकरासोबत लिव इनमध्ये राहणाऱ्या अविवाहित तरुणीने बाळाला जन्म दिला. मात्र समाजात बदनामीच्या भीतीने तिने नवजात बाळाला रस्त्याकडेला टाकून पळ काढला. शहरातील बोले पेट्रोल पंपाजवळ एका झाडाखाली बाळाला सोडून तरुणी निघून गेली मात्र थंडीमुळे व भुकेमुळे बाळाचा जन्मानंतर काही तासातच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशात राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीचे गावातीलच राजेश नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघांच्या अनैतिक संबंधातून ती गर्भवती झाली. मात्र गावात बदनामी होण्याच्या भीतीने दोघे चार महिन्यापूर्वू घरातून पळून नागपुरात आले. येथे ते एका घरात घरकाम करत होते.

दरम्यान कामानिमित्त राजेश तरुणीला सोडून हैदराबादला निघून गेला. त्यानंतर ४ जानेवारीला  तरुणीने बाळाला जन्म दिला. अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या बाळाला सोडून पुन्हा गावी जाण्याची तिची योजना होती. त्यामुळे तिने मध्यरात्रीच्या सुमारास एका झाडाखाली बाळाला ठेवले व निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी रस्त्याकडेला झाडाखाली काही नागरिकांना नवजात बाळ मृतावस्थेत दिसले. त्यांनी याची सुचना पोलिसांना दिली. 

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून बाळाच्या मातेचा शोध घेतला. संबंधित तरुणीवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान रस्त्याकडेला सोडलेले बाळ मृत जन्मास आले की, त्याची हत्या करण्यात आली, याचा तपास केला जात आहे.

WhatsApp channel

विभाग