Nagpur : प्रेम विवाहाचा करुण अंत, चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करून अपघाताचा रचला बनाव
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur : प्रेम विवाहाचा करुण अंत, चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करून अपघाताचा रचला बनाव

Nagpur : प्रेम विवाहाचा करुण अंत, चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करून अपघाताचा रचला बनाव

Jan 11, 2025 05:03 PM IST

Nagpur Crime : ा्हा वर्षापूर्वी त्यांनी घरच्यांचा विरोध पत्करून एकमेकांशी विवाह केला होता. दोघांचा सुखाने संसार सुरू होता, मात्र पतीच्या मनात पत्नीच्या चारित्र्यावरून संशयाचे भूत शिरले आणि सुखी संसाराचा सत्यानाश झाला.

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या
चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या

Husband Killed Wife : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या डोक्यात वार करत तिची हत्या केली आहे. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील तुळजाई नगरमध्ये ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी पतीने घटनेला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. 

राखी पाटील (२७) असे मृत महिलेचे नाव आहे तर आरोपी पतीचे नाव सुरज पाटील (३४) असे आहे. हे जोडपे त्यांच्या दोन मुलांसह (वय ५ आणि ३) दोन दिवसांपूर्वीच तुळजाई नगरमध्ये भाड्याच्या घरात राहायला गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार लग्नाआधी दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. सहा वर्षापूर्वी त्यांनी घरच्यांचा विरोध पत्करून एकमेकांशी विवाह केला होता. दोघांचा सुखाने संसार सुरू होता, मात्र पतीच्या मनात पत्नीच्या चारित्र्यावरून संशयाचे भूत शिरले आणि सुखी संसाराचा सत्यानाश झाला. पतीने पत्नीच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार करून तिचे डोके भिंतीवर आपटले. यात पत्नी जागीच गतप्राण झाली.

काही दिवसांपूर्वी राखी अचानक घरातून गायब झाली होती. यामुळे सूरजला तिचे दुसऱ्या कोणाबरोबर तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. राखी घरी परतल्यानंतर दोघांमध्ये यावरून सतत भांडणे होत होती. गुरुवारी हा वाद इतका वाढला की, रागाच्या भरात सूरजने राखीच्या डोक्यावर जड वस्तूने वार करून तिची हत्या केली. 

 सुरज आणि राखी यांनी तुळजाईनगर येथील नीलेश दधे यांच्या घरात भाड्याने खोली घेतली होती. गुरूवारी दुपारी दोघांमध्ये वाद होऊन सूरजने राखीच्या डोक्यावर जड वस्तूने वार करून तिची हत्या केली.

हत्येला अपघाताचे स्वरुप देण्याचा प्रयत्न -

पत्नीच्या हत्येला अपघाताचे स्वरुप देण्यासाठी त्याने पत्नीला वैद्यकीय रुग्णालयात नेले आणि पत्नी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून जखमी झाल्याचे सांगितले. मात्र ड़क्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले व याची सूचना पोलिसांना दिली. त्यानंतर राखीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. त्यामुळे प्राथमिक तपासातच पोलिसांना समजले की, पत्नीचा मृत्यू इमारतीवरून पडल्यामुळे नाही तर तिच्या डोक्यावर मारल्यामुळे झाला आहे. 

मात्र, पत्नीच्या मृत्यूनंतर आरोपी पती दोन्ही मुलांना घेऊन रुग्णालयातून गायब झाला होती. पोलिसांनी त्याला पत्नीच्या मृत्यूच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी त्याला बोलावून त्याला पकडले. त्याने आपल्या पत्नीच्या हत्येचा गुन्हा कबूल केला आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर