नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या मित्राचा टीशर्ट चे ३०० रुपये दिले नाहीत म्हणून खून केला. ३०० रुपयावरून दोन मित्रात वाद झाला त्यानंतर एकाने आपल्या भावाच्या मदतीने दुसऱ्या मित्राचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करत दोन्ही आरोपी भावांना अटक केली आहे.
३०० रुपयांच्या टी-शर्टच्या वादातून दोन तरुणांनी मित्राची हत्या केल्याच्या घटनेने नागपूर हादरले आहे. शुभम हरणे (वय २९, रामसुमेरबाबानगर) असे मृताचे नाव आहे, तर प्रयाग आस्वले व अक्षय ऊर्फ लख्खा आस्वले असोले हे आरोपी आहेत. कावरापेठ परिसरातील एका बारसमोर ही हत्या करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शांती नगर भागात रविवारी ही घटना घडली. शुभम हरणे याने आरोपी अक्षय आसोळे याला ३०० रुपये देण्यास नकार दिल्याने वाद वाढला. यानंतर अक्षयने भावासोबत मिळून शुभम हरणे याचा गळा चिरून खून केला.
अक्षयने ऑनलाइन शॉपिंग करून टी-शर्ट मागवला होता पण तो त्याला फिट बसत नसल्याने त्याने तो टीशर्ट शुभमला दिला. मात्र, शुभमने टी शर्टसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने अक्षय आणि शुभम यांच्यात वाद झाला. दरम्यान, वाद वाढल्यावर शुभमने रागाच्या भरात ३०० रुपये अक्षयच्या तोंडावर फेकून मारले. याचा राग आल्याने अक्षयने भावासोबत मिळत शुभमची हत्या केली.
अक्षय व त्याचा भाऊ प्रयाग अस्वले यांनी रागाच्या भरात शुभमचा गळा चिरला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही भावांना अटक केली आहे. त्यावेळी दोन्ही भाऊ मद्यधुंद अवस्थेत होते, अशी माहिती नागपूर चे डीएसपी महक स्वामी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, आरोपी व मृत तरुण मित्र होते. आरोपी मद्यधुंद अवस्थेत असताना ही घटना घडली. पैशाच्या वादातून त्यांनी शुभमची हत्या केली. डीएसपी म्हणाले की, आरोपींचा गुन्हेगारी रेकॉर्डदेखील आहे.
मृत शुभमही गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. गेल्या काही दिवसांपासून तो आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी परिसरात दहशत निर्माण करत होता. प्रयाग आणि अक्षय यांच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वी दारूच्या आरोपी व शुभम यांच्यात ऑनलाइन मागवलेल्या टी शर्टवरून वाद झाला व दारुच्या नशेत शुभमने अक्षयच्या कानफटात मारली. त्यांच्यात याआधीही वाद झाले आहेत. वाद सोडवण्यासाठी आरोपींनी शुभमला फोन करून बारसमोर भेटण्यास बोलावले. तेथे पुन्हा त्यांच्यात वाद झाल्याने आरोपीने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने शुभमचा गळा चिरला. जागीच तडफडून त्याचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या