चॉकलेटचे आमिष दाखवून ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, नागपूरमधील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  चॉकलेटचे आमिष दाखवून ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, नागपूरमधील घटना

चॉकलेटचे आमिष दाखवून ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, नागपूरमधील घटना

Updated Sep 16, 2024 08:03 PM IST

नागपूरमध्ये एका ८ वर्षीय चिमुकलीवर अनोळखी व्यक्तीने लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. अनोळखी आरोपीने चिमुकलीला चॉकलेटचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला.

नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

राज्यात लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बदलापूर, पुण्यानंतर आता नागपूरमध्ये संतापजनक घटना समोर आली आहे. शहरात एका ८ वर्षीय चिमुकलीवर अनोळखी व्यक्तीने लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. अनोळखी आरोपीने चिमुकलीला चॉकलेटचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेतला जात आहे. पीडितेच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ वर्षीय मुलगी व तिची ४ वर्षाची लहान बहीण दोघीच घरी होत्या. मुलीचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरी दोघीच रहात होत्या. त्यावेळी दुपारच्या सुमारास दुचाकीवरून एक व्यक्ती तिच्या घरी आला. या व्यक्तीचे वय अंदाजे ४० वर्ष असल्याचे सांगितले जात आहे. आरोपीने पीडित मुलीला घरात आई-वडील आहेत का विचारले. 

आरोपीने मुलीचे पालक घरात नसल्याची खात्री केली व घरात घुसला. आरोपीने मुलीच्या ४ वर्षाच्या बहिणीला घराबाहेर ठेऊन पीडितेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला घरात घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला. मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर हा आरोपी फरार झाला. पोलिसांनी पीडितेने सांगितलेल्या वर्णनावरून आरोपीचे स्केच तयार केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

रात्रीच्या वेळी मुलीचे पालक घरी आल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. हे सगळं ऐकून व मुलीची अवस्था पाहून आई-वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून आरोपीची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी आरोपीचे एक स्केच बनवून त्याचा शोध सुरू केला आहे. परिसरात या व्यक्तीबाबत चौकशी केली जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर