मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  iPhone साठी नागपूरमधील तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, आयुष्यच संपवलं

iPhone साठी नागपूरमधील तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, आयुष्यच संपवलं

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 03, 2022 10:19 AM IST

Girl Suicide For iPhone: कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तरीही आई वडिलांनी तिला आयफोन घेऊन देण्याचं आश्वासन दिलं होतं.

iPhone साठी नागपूरमधील तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, आयुष्यच संपवलं
iPhone साठी नागपूरमधील तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, आयुष्यच संपवलं (AFP)

एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून महाविद्यालयीन तरुण तरुणींकडून टोकाचं पाऊल उचललं जातं. अनेकदा असा घटना बघायला मिळतात. आता नागपूरमध्ये आयफोन न मिळाल्याने एका मुलीने आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. आई वडिलांकडून आयफोन देण्याचं आश्वासन दिलं गेलं, पण तो लवकर न मिळाल्यानं मुलीने टोकाचं पाऊल उचललं.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नागपूरमध्ये तरुणीने iPhone साठी आत्महत्या केलीय. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तरीही आई वडिलांनी तिला आयफोन घेऊन देण्याचं आश्वासन दिलं होतं. आयफोन लवकर न घेतल्यानं आपल्याला आई वडिल तो घेऊ देणार नाहीत असं मुलीला वाटलं. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

तरुणी नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा शहरात शिकत होती. रायसोनी महाविद्यालयाची विद्यार्थीनी असलेल्या तरुणीने घरातील बेडरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकऱणी पोलिसांनी मुलीच्या आई वडिलांचा जबाब नोंदवला आहे. मुलगी सतत आयफोन घेण्यासाठी आई वडिलांच्या मागे लागली होती असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

मुलीचे आई वडील गृहउद्योग चालवतात, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती. तरीही आई वडिलांनी तिला आयफोन घेऊन देऊ असं आश्वासन दिलं. मात्र काही काळ गेल्यानंतरही आयफोन न घेतल्यानं आता आपल्याला आई वडील आयफोन घेऊ देणार नाहीत अस तिला वाटलं. शेवटी तिने घरात पख्याला गळफास घेत आत्महत्या केली.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग