Nagpur Hit and Run Case : काय तर गडबड आहे भाऊ..! बारच्या सीसीटीव्ही फुटेजमधून संकेत बावनकुळे आणि त्याचे मित्र गायब?-nagpur audi car accident sanket bawankule and his friends missing from lahori restaurant and bar cctv footage ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Hit and Run Case : काय तर गडबड आहे भाऊ..! बारच्या सीसीटीव्ही फुटेजमधून संकेत बावनकुळे आणि त्याचे मित्र गायब?

Nagpur Hit and Run Case : काय तर गडबड आहे भाऊ..! बारच्या सीसीटीव्ही फुटेजमधून संकेत बावनकुळे आणि त्याचे मित्र गायब?

Sep 13, 2024 08:51 PM IST

Nagpur Audi car accident : ऑडी कार अपघात प्रकरणी मोठी बातमी समोर आली असून लाहोरी रेस्टॉरंट आणि बारमधील सीसीटीव्ही फुटेजमधून संकेत बावनकुळे,अर्जुन हावरे,रोनित चिंतमवार आणि आणखी एक तरुण गायब असल्याचे सांगितले जात आहे.

बारच्या सीसीटीव्ही फुटेजमधून संकेत बावनकुळे आणि त्याचे मित्र गायब?
बारच्या सीसीटीव्ही फुटेजमधून संकेत बावनकुळे आणि त्याचे मित्र गायब?

Nagpur Audi Car Accident : पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर आता नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री भरधाव ऑडी कारनं दोन कार आणि एका मोटारसायकलीला धडक दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी अर्जुन हावरे चालक आणि रोहित चिंतमवार यांच्याविरोधात रॅश ड्रायव्हिंगच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र ही कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या (Chandrashekhar Bawankule)यांचा मुलाग संकेत बावनकुळे (Sanket Bawankule)याची असल्याचं समोर आल्यानंतर हे प्रकरण राज्यात चर्चेत आले आहे. तसेच अपघात झाला त्यावेळी संकेतही ऑडीमध्ये असल्याचं तपासात समोर आलं आहे.

अपघाताची घटना सीसीटीव्हीतही कैद झाली असून याचा व्हिडिओ समोर आला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पहिल्यांदा संकेत बावनकुळे यांचं नाव घेतल्यानंतर हे प्रकरण तापलं. आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली असून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बावनकुळेंचा मुलगा सीसीटीव्हीतून गायब -

ऑडी कार अपघात प्रकरणी मोठी बातमी समोर आली असून पोलिसांनी शहरातील लाहोरी रेस्टॉरंट आणि बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. मात्र त्या फुटेजमध्ये संकेत बावनकुळे, अर्जुन हावरे, रोनित चिंतमवार आणि  आणखी एक तरुण दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज लाईव्हमध्ये पाहण्याची सोय आहे.  त्याचे रेकॉर्डिंग डीव्हीआरमध्ये झालेले नाही. हे चार तरुण बारमध्ये गेले होते मात्र ते सीसीटिव्हीत कैद झाले नसल्याचे समोर आले आहे.

सीसीटीव्ही फुटेश डिलीट केल्याचा संशय-

दरम्यान नागपूर पोलिसांनी हॉटेलचे डीव्हीआर जप्त केले असून याची फॉरेन्सिक चाचणीही केली जाणार आहे. त्यामुळे जर डीव्हीआरमधील काही फुटेज डिलीट केले असतील, तर फॉरेन्सिक चाचणीतून समोर येईल,  असं पोलिसांनी सांगितलं. लाहोरी हॉटेल ते अपघात स्थळादरम्यान तीन ते चार ठिकाणांचे रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्याआधारे तपास सुरू आहे.

अपघातावेळी ऑडी कारमध्ये अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार आणि संकेत बावनकुळे असे तिघेजण बसले होते. संकेत बावनकुळे गाडीत होता व तो वाहन चालवणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे अर्जुन हावरेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner