Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर भीषण अपघात! लष्कराच्या २ जवानांचा मृत्यू, ६ गंभीर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर भीषण अपघात! लष्कराच्या २ जवानांचा मृत्यू, ६ गंभीर

Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर भीषण अपघात! लष्कराच्या २ जवानांचा मृत्यू, ६ गंभीर

Jun 17, 2024 06:14 AM IST

Nagpur Accident : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ऑटो रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला असून या अपघातात २ जवानांचा मृत्यू झाला आहे. शहराजवळील कन्हान नदीच्या पुलावर सायंकाळी ५ वाजता झालेल्या या अपघातात ऑटो चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.

नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर भीषण अपघात! लष्कराच्या २ जवानांचा मृत्यू, ६ गंभीर
नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर भीषण अपघात! लष्कराच्या २ जवानांचा मृत्यू, ६ गंभीर

Nagpur Accident : नागपूर येथील जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्हान नदीवरील पुलावर रविवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स बस व ऑटोची समोरा समोर धडक झाली या अपघातात २ सैनिकाचा मृत्यू झाला आहे. तर ६ सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात ऑटो चालकालाही गंभीर दुखापत झाली आहे. नागपूरच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या ८ जवानांपैकी विघ्नेश आणि धीरज राय यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

या अपघातात दीन प्रधान, कुमार पी, शेखर जाधव, अरविंद, मुरुगन आणि नगररत्नम हे जवान जखमी झाले आहेत. त्यांना कामठी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कुमार पी आणि नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेले नगररत्नम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. तर ऑटोचालक शंकर खारकबान याच देखील प्रकृती चिंताजनक आहे. नागपूरपासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या कामठी येथे असलेल्या लष्कराच्या गार्ड रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटरचे (जीआरसी) एकूण १५ सैनिक हे कन्हान येथे दोन ऑटोमधून खरेदीसाठी गेले होते.

जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गार्ड रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटर (जीआरसी) कामठी येथील १५ जवान हे रविवार सुट्टीचा दिवस असल्याने कन्हान बाजारात खरेदीसाठि गेले होते. दुपारी ५ च्या सुमारास सर्व सैनिक दोन ऑटोने कामठी येथील त्यांच्या सैनिक प्रशिक्षण केंद्रात परत येत होते. यावेळी त्यांनी दोन रिक्षा केल्या. ऑटो क्रमांक (एमएच ४९ एआर ७४३३) मध्ये ८ सैनिक नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाने कामठीकडे सेंटरकडे जात होते. यावेळी कन्हान नदी पुलावर विरुद्ध दिशेने नागपूरवरून शिवनी मध्य प्रदेशकडे जाणारी पवन ट्रॅव्हल्स बस भरधाव वेगात येऊन ऑटोला धडकली. ही धडक ऐवढी भयंकर होती की आटोचा चक्काचूर झाला.

हा अपघात झाल्यावर स्थानिक नागरिक व दुसऱ्या ऑटोमधील सैनिकांनी तातडीने जखमींना बाहेर काढले. त्यांना कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ८ सैनिक व ऑटो चालक हे गंभीर जखमी असल्याने अरविंद, विघ्नेश, डी प्रधान, नाभा रत्नम, धीरज राय व ऑटो चालक शंकर विठूलाल खरागबाण (वय 50 राहणार गोरा बाजार) यांना मेयो हॉस्पिटल नागपूर येथे उपचारासाठी तर कुमार पी, जाधव शेखर, कुमार मर्गन यांना कामठी नागपूर मार्गावरील एक दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बस चालकाला अटक

मात्र, उपचार सुरू असतांना रात्री ९ च्या सुमारास न्यू हॉस्पिटलमध्ये भरती असलेले विघ्नेश जी, धीरज राय या दोन सैनिकाचा मृत्यू झाला. अपघात होताच ट्रॅव्हल बसचा चालक बस सोडून प्रसार झाला होता. रात्री ९ वाजता त्याला अटक करण्यात आली. मधुकर विठ्ठलराव काळे (वय ६०, रा. रवीशंकर वार्ड गोंदिया) असे ट्रॅव्हल बस चालकाचे नाव आहे. तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर