Nagpur Accident News: नागपूर (Nagpur) जिल्ह्यात कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या (Kalameshwar Police Station) हद्दीत शु्क्रवारी कार नदीत कोसळल्याने भीषण अपघात घडला. कळमेश्वर येथील रथयात्रा व मिरवणूक बघण्यासाठी गेलेल्या वडिलांना घरी परत आणताना बाप- लेकावर काळाने घाला (Father and son dies) घातला. तर, एकजण जखमी झाला. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, भय्याजी टाले (वय, ६५) आणि त्यांचा मुलगा रवींद्र टाले (वय,३५) अशी मृतांची नावे आहेत. भय्याजी शुक्रवारी कळमेश्वर येथील रथयात्रा व मिरवणूक बघण्यासाठी गेले होते. मात्र, उशीर होऊनही ते घरी न परतल्याने रवींद्र आणि राहुल डोमके (वय, ३५) हे दोघेही कार घेऊन कळमेश्वरला पोहोचले. यानंतर पहाटे भय्याजी यांना घेऊन तोंडखैरीच्या दिशेने निघाले. मात्र, गोवरी परिसरात रवींद्रचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार झाडाला आदळून नदीत पडली. या अपघातात भय्याजी टाले आणि रवींद्र यांचा मृत्यू झाला. तर, राहुल जखमी झाला. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, एकाच वेळी बाप- लेकाचा मृत्यू झाल्याने टाले कुटुंबावर दुख:चे डोंगर कोसळले आहे.
हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील राहोली पाटीजवळ दोन वाहनामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. यामुळे परिसरात एकच शोककळा परसली आहे. शनिवारी(२७ एप्रिल २०२४) रोजी रात्री उशिरा हा अपघात झाल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांनी दिली.
वैभव आणि शुभम असे अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांचे नाव आहेत. काही कामानिमित्ताने दोघं मित्र मोटरसायकलवरून जात असताना हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील राहोली पाटीजवळ त्यांच्या मोटारसायकलला अपघात घडला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबाने घटनास्थळी धाव घेतली. यात दोघांचाही मृत्यू झालेला बघून कुटुंबाने हंबरडा फोडला. दरम्यान रात्री जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह आणण्यात आले होते.
संबंधित बातम्या