मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur: आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षांच्या मुलीला सर्पदंश, उपचारादरम्यान मृत्यू

Nagpur: आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षांच्या मुलीला सर्पदंश, उपचारादरम्यान मृत्यू

Sep 21, 2023 03:40 PM IST

Nagpur snakebite news: नागपूरच्या दाभा परिसरात चार वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Snake
Snake

4-year-old girl dies By snakebite: नागपूरच्या दाभा परिसरात सर्पदंशाने चार वर्षाच्या चिमुकलीला मृत्यू झालाय. आईच्या कुशीत झोपलेली असताना चिमुकलीला सापाने दंश केला. रविवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, सोमवारी दुपारी चार वाजताच्यादरम्यान या मुलीचा उपचारदम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले.

सिद्धांती धोंगडे (वय, ४) असे सर्पदंशानंतर मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. सिद्धांती नागपूरच्या दाभी परिसरातील रहिवाशी आहे. सिद्धांती रविवारी रात्री तिच्या आईच्या कुशीत झोपली होती. त्यानंतर मध्यरात्री तिला सापाने दंश केला. तिच्या रडण्याच्या आवाज ऐकून सगळेच जागे झाले. त्यावेळी त्यांना मण्यार जातीचा साप दिसला. यानंतर घरच्यांनी तिला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उपचारदरम्यान सिद्धांतीचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. मुलीच्या मृत्युची बातमी कळताच तिची आई रुग्णालयातच बेशुद्ध झाली. यामुळे सिद्धांतीच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी दुपारी सिद्धांतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबई: मतिमंद मुलीवर आळीपाळीने बलात्कार

मुंबईत धावत्या टॅक्सीत मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. सलमान आणि प्रकाश पांडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी घरच्यांशी भांडण करून टॅक्सीत बसली होती. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर बलात्कार करून तिला वाकोला परिसरात सोडले. याप्रकरणी पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर