मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘माझा गट हीच खरी शिवसेना’; एकनाथ शिंदे करणार राज्यपालांकडे दावा

‘माझा गट हीच खरी शिवसेना’; एकनाथ शिंदे करणार राज्यपालांकडे दावा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 22, 2022 10:03 AM IST

पक्षांतर बंदी कायद्याची कारवाई टाळण्यासाठी शिंदे यांना ३७ हा जादूई आकडा हवा आहे. पण, शिंदे यांनी त्यांच्याकडे ५० आमदार असल्याचा दावा केला आहे. ‘माझा गट हीच खरी शिवसेना,’ असे सांगत शिंदे हे राज्यपालांकडे दावा करणार असल्याचे समजतयं.

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Maharashtra Political crises राज्याच्या राजकारणात काल सकाळपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. एकनाथ शिंदे आणि नाराज आमदारांचा गट हा गुवावाटी येथे पोहचला आहे. पक्षांतर बंदी कायद्याची कारवाई टाळण्यासाठी शिंदे यांना ३७ हा जादूई आकडा हवा आहे. पण, शिंदे यांनी त्यांच्याकडे ५० आमदार असल्याचा दावा केला आहे. ‘माझा गट हीच खरी शिवसेना,’ असे सांगत शिंदे हे राज्यपालांकडे दावा करणार असल्याचे समजतयं.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेसह संपूर्ण महाविकास आघाडी हादरली आहे. विधानपरिषदेचा निकाल लागण्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी राज्याच्या राजकारणात पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदे यांनी २० आमदारांसह थेट सुरत गाठल्याने राज्यात राजकीय भूकंप पाहयला मिळाला. सुरवातीला त्यांच्या सोबत केवळ २० आमदार असल्याची माहिती होती. मात्र, एक मोठा नाराजांचा गट त्यांना जाऊन मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या गटात ५० आमदांरांचे संख्याबळ असल्याचा विश्वास या गटाने व्यक्त केला आहे. दरम्यान, काल हे आमदार सुरतहून थेट गुवाहाटीला पोहचले. एका हॉटेलमध्ये हे सर्व आमदार आहेत.

पक्षांतर बंदीची कारवाई टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांना ३७ हा जादूई आकडा हवा आहे. गुवाहाटी येथे पोहचल्यावर त्यांच्या सोबत जवळपास ३५ आमदार असल्याचे त्यांनी काढलेल्या छायाचित्रात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या सोबत ५० आदारांचा पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे संकटात सापडले आहे हे निश्चीत झाले आहे.

दरम्यान, गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या नाराज आमदारांचा गटाची बैठक सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी माझा गट हिच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. ते या गटाला घेऊन राज्यपालांना भेटण्याची शक्यता आहे. पण सध्या त्यांना कोरोना झाल्यामुळे तुर्तास हे शक्य नाही असे दिसते. दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते मंडळही बैठक घेणार आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या