MVA Seat Sharing : महाविकास आघाडीचं ठरलं! ठाकरेंची शिवसेना ९५-१०० जागांवर लढणार, मुंबईतील जागांचा तिढाही सुटला-mva seat sharing vidhan sabha election 2024 uddhav thackeray group consensus on 95 to 100 seats ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MVA Seat Sharing : महाविकास आघाडीचं ठरलं! ठाकरेंची शिवसेना ९५-१०० जागांवर लढणार, मुंबईतील जागांचा तिढाही सुटला

MVA Seat Sharing : महाविकास आघाडीचं ठरलं! ठाकरेंची शिवसेना ९५-१०० जागांवर लढणार, मुंबईतील जागांचा तिढाही सुटला

Oct 02, 2024 08:38 PM IST

maha vikas aghadi : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यानुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस १०० ते १०५ जागा, ठाकरे गट ९५ ते १०० जागा तर शरद पवारांची राष्ट्रवादी ८५ ते ८० जागांवर लढण्याची शक्यता आहे.

 महाविकास आघाडीचं ठरलं!
 महाविकास आघाडीचं ठरलं!

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महाराष्ट्राची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत.महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून महाविकास आघाडीतील जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरु होते. गेल्या तीन दिवसांपासून सलग बैठका घेतल्या जात होत्या. आजच्या बैठकीनंतरमहाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यानुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस १०० ते १०५ जागा, ठाकरे गट ९५ ते १०० जागा तर शरद पवारांची राष्ट्रवादी ८५ ते ८० जागांवर लढण्याची शक्यता आहे.

मुंबईतील जागांचा तिढाही सुटला -

महाविकास आघाडीतील बैठकीमध्ये मुंबईतील ३६ पैकी २३ जागांचा तिढा सुटला आहे. यानुसार ठाकरेंची शिवसेना १३,  काँग्रेस ८, शरद पवारांची राष्ट्रवादी केवळ १ जागा लढणार आहे. त्याचबरोबर मुंबईत मविआतील घटक पक्ष समाजवादी पक्षालाही एक जागा दिली आहे. घाटकोपर पूर्व जागा राष्ट्रवादी पवार गटाला तर शिवाजीनगरची जागा समाजवादी पार्टीला मिळाली आहे.

मातोश्रीवर राज्यभरातील विधानसभानिहाय स्थितीचा आढावा घेण्यात आला. गेल्या १० दिवसापासून मातोश्रीवर राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेऊन विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला.

एक-दोन दिवसात जागावाटपाची घोषणा?

महाविकास आघाडीत ठरलेल्या सूत्रानुसार एखाद्या घटक पक्षाला ज्या मतदार संघात अनुकूल वातावरण असेल तो मतदारसंघ त्या पक्षाला सोडला जाणार आहेत. त्याचबरोबर ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा विद्यमान आमदार आहे, ती जागा संबंधित पक्षाला सोडण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. काही जागांवर वाद असून त्यावर चर्चा सुरू आहे. नवरात्री संपताच महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. ज्या जागांवर एकापेक्षा अधिक पक्ष दावेदार असतील, तेथे वरिष्ठ नेते बैठक घेऊन येत्या दोन दिवसात तोडगा काढणार असल्याचे समजते.

त्यासोबतच महाविकास आघाडीमध्ये विद्यमान आमदार असलेल्याचे तिकीट कापले जाणार नसल्याचे बोलले जात आहे. येत्या चार-पाच दिवसात महाविकास आघाडीचे चर्चा वाटप पूर्ण होणार आहे. त्यानंतर लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner