लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला ३०००; राहुल गांधींकडून मविआच्या ५ गॅरंटींची घोषणा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला ३०००; राहुल गांधींकडून मविआच्या ५ गॅरंटींची घोषणा

लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला ३०००; राहुल गांधींकडून मविआच्या ५ गॅरंटींची घोषणा

Nov 06, 2024 08:49 PM IST

maha vikas aghadi manifesto : मुंबईतील सभेत महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला. महाविकास आघाडीने जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा केल्या आहेत. या मोफत बससेवा, शेतकऱ्यांसाठी ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ आदींचा समावेश आहे.

महाविकास आघाडीच्या ५ गॅरंटी
महाविकास आघाडीच्या ५ गॅरंटी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीची प्रचारमोहीम आजपासून सुरू झाली. मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त सभा होत आहे. या सभेसाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. या सभेत महाविकास आघाडीने ५ गॅरंटी जाहीर केले.

मुंबईतील सभेत महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला. महाविकास आघाडीने जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा केल्या आहेत. या मोफत बससेवा, शेतकऱ्यांसाठी  ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ आदींचा समावेश आहे.

तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन.जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील. बेरोजगार तरुणांना ४ हजार रुपयांपर्यंत मदत अशा मोठ्या योजनांचा समावेश आहे.  

महाविकास आघाडीच्या पाच  प्रमुख गॅरंटी (Mva manifesto) -

  • महालक्ष्मी योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.
  • शेतकऱ्यांना ३  लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५०  हजार रुपयांचे प्रोत्साहन.
  • जातनिहाय जनगणना करणार तसेच ५०  टक्के आरक्षणाची मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न केले जाणार.
  • राज्यातील नागरिकांना २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे.
  • बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४ हजार रुपयांचा बेरोजगार भत्ता देणार.

राहुल गांधींनी महाविकास आघाडीची पंचसुत्री (maha vikas aghadi manifesto) जाहीर केली. मविआचं सरकार आल्यानंतर महालक्ष्मी योजना लागू केली जाईल. या याजनेंतर्गत महिला आणि मुलींना मोफत बस प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. शिवाय त्यांच्या बँक खात्यात दरमहिन्याला ३००० रुपये जमा केले जाणार असल्याची मोठी घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे. 

राहुल गांधी म्हणाले, नागपूरमध्ये मी संविधानाबाबत बोललो, ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडे अब्जाधीशांचं सरकार, दुसरीकडे तरुणांचं, लहान दुकानदार, उद्योजकांचं सरकार म्हणून इंडिया आघाडीनं महाराष्ट्रात पाच गॅरंटी दिली आहे. आपण महालक्ष्मी योजनेची माहिती तुम्हाला देणार असल्याचं राहुल गांधी म्हणाले. प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात महिन्याला  तीन हजार महाविकास आघाडीचं सरकार टाकणार आहे. 

Whats_app_banner