Muslim woman gives birth on Mahalaxmi Express : महालक्ष्मी एक्सप्रेसने गावी जात असणाऱ्या एका मुस्लिम महिलेने धावत्या गाडीत एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसूती सुखरूप झाल्याने या मुलीच्या पालकांनी मुलीचे नाव गाडीच्या नावावरून अर्थात महालक्ष्मी देवी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.
मीरा रोड येथील फातिमा खातून (वय ३१) या महिलेने ६ जून रोजी कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लोणावळा स्थानक ओलांडल्यानंतर एका मुलीला जन्म दिला. बाळ सुखरूप आणि सुदृढ असल्याने फातीमाचे वडील तय्यबने बाळाचे नाव ट्रेनच्या नावावर महालक्ष्मी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
तिरुपती ते कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरापर्यंत प्रवास करणाऱ्या काही सहप्रवाशांनी सांगितले की, गाडीत जन्मलेल्या माझ्या मुलीचा रेल्वेत जन्म होणे म्हणजे देवीचे दर्शन घेण्यासारखे आहे. म्हणून मी तिचे नाव महालक्ष्मी ठेवण्याचा निर्णय घेतला," असे मुलीचे वडिली तय्यब यांनी मध्यमानशी बोलतांना सांगितले. कर्जत येथील रेल्वे पोलिस (जीआरपी) ने फातिमाला वैद्यकीय मदत पुरवल्याबद्दल तसेच त्यांच्या तत्परतेबद्दल कौतुक केले.
फातिमा आणि तय्यबला आधीच तीन मुले आहेत. फातिमाची प्रसूती तारीख ही २० जून होती. त्यामुळे दोघांनी कोल्हापूर ते मुंबई असा रेल्वे प्रवास ६ जून रोजी करण्याचा निर्णय घेतला. तय्यब म्हणाले, "इंजिन बिघाडामुळे ट्रेन दोन तासांपेक्षा जास्त वेळ लोणावळा येथे थांबली. रात्री ११ च्या सुमारास ती पुन्हा सुरू झाली, तेव्हा माझ्या पत्नीला प्रसवकळा सुरू झाल्या. दरम्यान, ती शौचालयात गेली. पण बराच वेळ ती परत आली नाही. त्यामुळे मी तिला आवाज दिला. दरम्यान, तिने तिथे बाळाला जन्म दिल्याचे आढळले. दरम्यान, काही महिला प्रवासी आमच्या मदतीला आल्या.
ट्रेनमधील एका जीआरपी कॉन्स्टेबलने तय्यबला जीआरपी हेल्पलाइनवर कॉल करून परिस्थितीची माहिती देण्याचा सल्ला दिला. गाडी कर्जत स्टेशनवर आल्यावर कुटुंब उतरले.
कर्जत जीआरपीचे एपीआय मुकेश ढेंगे म्हणाले, "आम्ही कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला याची माहिती दिली. परिचारिका शिवांगी साळुंके व कर्मचारी तातडीने स्टेशनवर पोहोचले. महिला आणि बाळाला पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तीन दिवसांच्या उपचारानंतर आई आणि बाळाला घरी सोडण्यात आल्याचे हॉस्पिटलच्या सहाय्यक मॅट्रन सविता पाटील यांनी सांगितले.
संबंधित बातम्या