Pimpri chinchwad murder news : पिंपरी-चिंचवड येथे धक्कादायक घटना पुढे आली आहे. आधी आत्महत्या वाटणारी घटना खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हत्येमुळे पोलीसही चक्रावले आहेत. पुण्यातील वाकड परिसरात हे हत्याकांड घडले. एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या तरुणीचा फायदा घेऊन तिच्यावर तिच्या मित्रानेच बलात्कार केला. ही घटना तरुणीने तिच्या मानलेल्या भावाला सांगितल्याने संतप्त झालेल्या भावाने बलात्कार करणाऱ्या तरुणाची हत्या केली.
पिंपरी : चिंचवडमध्ये एक अनोख्या हत्येच प्रकरण समोर आलं. ज्यामुळे पोलीस देखील हैराण झाले होते. आधी आत्महत्या वाटणारी घटना अचानक हत्येत बदलली. शहरातील वाकड परिसरात मानलेल्या बहिणीवर अत्याचार करणाऱ्या मित्राची हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेमध्ये आरोपी लोकेंद्र किशोर सिंह ला अटक करण्यात आली आहे. निकेत कुणाल असं हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. त्याने मद्यधुंद असलेल्या मैत्रिणीचा गैरफायदा घेत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. याबाबतची माहिती पीडित तरुणीने मानलेला भाऊ लोकेंद्रला दिली. लोकेंद्र आणि निकेत कुणाल यांच्यात जबर भांडण झालं. लोकेंद्र ने निकेत कुणाला विटेने मारहाण केली. भिंतीवर डोकं आदळलं होत.
निकेत कुणाल असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर लोकेंद्र किशोर सिंह असे हत्या करणाऱ्या मानलेल्या भावाचे नाव आहे. आरोपी, हत्या झालेला तरुण आणि पीडित तरुणी हे तिघे ओळखीचे असून मित्र आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोकेंद्र किशोर सिंह, हत्या झालेला निकेत कुणाल आणि पीडित तरुणी मित्र आहेत. लोकेंन्द्र सिंह आणि तरुणी हे मानलेले भाऊ बहीण आहे. निकेत कुणाल व पीडित तरुणी आणि आरोपी लोकेंद्र हे तिघेही काही दिवसांपूर्वी एका कंपनीत सोबतच कामाला होते. यानंतर निकेत कुणाल व पीडित तरुणी हे एका कंपनीत काम करत होते. ३ एप्रिलला कंपनीची पार्टीनिमित्त निकेत कुणाला व पीडित तरुणी एकत्र पार्टीत गेले. त्या ठिकाणी त्यांनी मद्यपान केले. पीडित तरुणीने जास्त मद्यपान केल्याने ती शुद्धित नव्हती. या अवस्थेत तिने निकेत कुणालला टीच्या फ्लॅटवर सोडण्यास सांगितले. मात्र, निकेतने तिला टीच्या फ्लॅटवर न सोडता, त्याच्या फ्लॅटवर नेऊन मद्यधुंद असलेल्या तरुणीचा फायदा घेत, तिच्यावर बलात्कार केला. शुद्धित आल्यावर हा प्रकार तरुणीला समजला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. ती रागाच्या भरात तिच्या फ्लॅवर गेली.
यावेळी तिने ही सगळी घटना तिचा मानलेला भाऊ लोकेंद्राला सांगितली. लोकेंद्रला देखील हे सर्व ऐकून संतापला. त्याने थेट पीडित बहिणीसह निकेतचा फ्लॅट गाठला. पीडित तरुणी खालीच थांबलेली होती. लोकेंद्र व निकेतन यांच्यात मोठे भांडण झाले. लोकेंद्रने निकेतला जबर मारहाण केली. त्याचे डोके विटेने फोडले व भिंतीवर आपटले. यात निकेत हा गंभीर जखमी झाला. यानंतर लोकेंद्र व त्याची बहिण दोघेही निघून गेले. दरम्यान, जखमी अवस्थेत निकेत कुणाल हा खासगी दाखण्यात गेला. यानंतर तो उपचार घेऊन घरी आला. दरम्यान, निकेत हा त्याच्या एका दुसऱ्या मित्रासोबट फ्लॅटमध्ये राहत होता.
घरी आल्यावर तो विचारात गुंतला. पीडित तरुणी आणि तिचा भाऊ पोलिसांत तक्रार देईल ही भीती निकेतला होती. आपली बदनामी होईल या भीतीने त्याने गळफास घेतला. दुसऱ्या दिवशी निकेतचा मित्र त्याच्या बेडरूममधून बाहेर आल्यावर त्याने गळफास घेतला असल्याचे दिसले. त्याने त्याला तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दरम्यान, गळफास घेऊन निकेत कुणालने आत्महत्या केली. असा संशय हिंजवडी पोलिसांना होता. मात्र, पोस्टमार्टम केल्यानंतर निकेतचा मृत्यू हा डोक्याला इजा झाल्याने झाल्याचे पुढे आले. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपी लोकेंद्र किशोर सिंह याला अटक केली.
संबंधित बातम्या