washim murder : वाशिम हादरलं! शेतात काम करणाऱ्या महिलेची हत्या; बलात्काराचा संशय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  washim murder : वाशिम हादरलं! शेतात काम करणाऱ्या महिलेची हत्या; बलात्काराचा संशय

washim murder : वाशिम हादरलं! शेतात काम करणाऱ्या महिलेची हत्या; बलात्काराचा संशय

Published Sep 08, 2024 10:51 AM IST

washim murder : वाशिम जिल्ह्यात एका डोंगरावर महिलेचा मृतदेह सापडला आहे. या महिलेच्या अंगावर तीव्र जखमा आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

 शेतात काम करणाऱ्या महिलेची हत्या; बलात्काराचा संशय
शेतात काम करणाऱ्या महिलेची हत्या; बलात्काराचा संशय

washim murder : वाशिम जिल्ह्यात मालेगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतात काम करत असलेल्या एका महिलेची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, या महिलेवर बलात्कार झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात एका ४५ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या महिलेचा मृतदेह गावाजवळील जंगलामध्ये असलेल्या टेकडीवर आढळला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही महिला तिच्या माहेरी राहणारी आली होती. ती दोन दिवसांपूर्वी शेतात काही कामासाठी गेली होती. मात्र, रात्र झाली तरी ही ही महिला घरी परतली नव्हती. घरच्यांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. त्यांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात जात महिला बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी देखील या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. दोन दिवसांनी शनिवारी तिचा मृतदेह गावाशेजारील जंगलामध्ये एका टेकडीवर आढळला.

महिलेवर अनेक वार

या महिलेच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. तिच्या शरिवावर जखमा देखील होत्या. तसेच तिचे कपडे विवस्त्र होते. त्यामुळे या महिलेवर बलात्कार करण्यात आला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

गुन्हा दाखल

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेच्या भावानं पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलेवर बलात्कार करून नंतर हत्या करण्यात आली असवई असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर