murder news : लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात रावणकोळा गावात एक खळबळजनक घटना घडली आहे. जुन्या वादातून दोन चुलत भावांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, पाच पैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
महेश उत्तम सूर्यवंशी (वय २०) आणि विकास शिवाजी सूर्यवंशी (वय २३, दोघेही रा. रावणकोळा, ता. जळकोट, जि. लातूर) असे खून झालेल्या चुलत भावांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश मुरारी सूर्यवंशी असे आरोपीचे नाव आहे तर इतर आरोपींची नावे समजू शकली नाही.
लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात रावणकोळा येथे हे दोन्ही भाऊ ऑनलाइन फॉर्म आणि कॅम्पुटरचे दुकान चालवत होते. यावरून महेश सूर्यवंशी यांच्यात वाद होते. या पूर्वी देखील त्यांच्यात भांडणे झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री प्रकाश मुरारी सूर्यवंशी आणि त्याच्याबरोबरच्या इतर चार जणांनी धारदार शस्त्रांनी महेश आणि विकास या दोघांवर हल्ला केला. यात दोघांचाही मृत्यू झाला. जुन्या वादातून मनात राग धरून दोघांची हत्या केली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मृतदेह जळकोट येथील दवाखान्यात शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी तातडीने पथकांची स्थापना करून पाच पैकी तीन आरोपींना अटक केली आहे. तर आरोपी फरार आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. या पैकी एक आरोपी ही महिला असल्याची देखील माहिती आहे.
दरम्यान, या घटनेमुळे रावणकोळा येथे दहशतीचे वातावरण आहे. यानंटर परिसरातील नागरिकांनी देखील घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पुढील तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी या परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.