पुणे : पुण्यातील लष्कर परिसरात नागरिकांना त्रास देऊन त्यांना मारहाण करून त्रास देणाऱ्या एका सराईत गुंडाने एकाच्या बहिणीची छेड काढल्याने त्याचा कट करूच खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
फैजान रफिक शेख (वय २६, रा. चुडामण तालीमजवळ, भवानी पेठ), गुफरान मुज्जफर मोमीन (वय २१, रा. याकुबनगर चौक, भवानी पेठ) आणि जगदीश शंकर दोडमणी (वय २२, रा. भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर अरबाज ऊर्फ बबन इकबाल शेख (वय ३५, रा. भवानी पेठ) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. ही घटना ताबुल स्ट्रिटवरील सार्वजनिक रोडवर शनिवारी पहाटे ३.३० मिनिटांनी घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरबाज हा सराईत गुन्हेगार होता. तो लोकांना मारहाण करुन खिशातील पैसे काढून घेत. अरबाज शेख याच्यावर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, मारहाण, विनयभंग असे किमान २५ गुन्हे समर्थ व खडक पोलीस ठाण्यात दाखल होते. अरबाज हा भवानी पेठ आणि कॅम्प भागातील विक्रेत्यांवर तो दादागिरी करीत त्यांच्याकडून हप्ता वसूल करत होता. तसेच त्यांच्या गाड्यांवर मोफत खाणे, विक्रेत्यांकडील वस्तू जबरदस्तीने उचलून नेत होता. त्याच्या दादागिरीला नागरीक कंटाळले होते. पुणे पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीए कायद्या अंतर्गत तडीपार करण्यात आले होते. तो जेलमध्ये देखील होता. त्याची दहा दिवसांपूर्वीच त्याची सुटका झाली होती.
यानंतर त्याने पुन्हा नागरिकांना त्रास देणे सुरू केले. दरम्यान, शनिवारी त्याने एका महिलेची छेड काढली. यामुळे आरोपींनी अरबाजची हत्या करण्याचे ठरवले. आरोपींनी मध्यरात्रीनंतर लष्कर परिसरातील ताबुत स्ट्रिट येथे बोलावले. यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादात आरोपींनी अरबाजवर धारधार शस्त्राने वार करुन त्यांचा खून केला. पोलीस निरीक्षक प्रियंका शेळके पुढील तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या