मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nilesh Rane : पुणे महापालिकेचे पावणे चार कोटी थकवले! नीलेश राणे यांची मालमत्ता सील

Nilesh Rane : पुणे महापालिकेचे पावणे चार कोटी थकवले! नीलेश राणे यांची मालमत्ता सील

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 28, 2024 03:17 PM IST

PMC Action on Nilesh Rane r deccan property : पुणे महानगर पालिकेने नीलेश राणे यांच्या पुण्यातील डेक्कन येथील आर डेक्कन मालमत्ता सील करत दणका दिला आहे. राणे यांनी या जागेचा तब्बल पावणे चार कोटींचा कर थकवला आहे.

PMC Action on Nilesh Rane r deccan property
PMC Action on Nilesh Rane r deccan property

PMC Action on Nilesh Rane r deccan property : पुणे महानगर पालिकेने थकबाकी दारांवर धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईचा दंडुका भाजप नेते नीलेश राणे यांना बसला आहे. राणे यांची डेक्कन येथील आर डेक्कन मॉल ही व्यावसायिक मालमत्ता असून या जागेचा तब्बल पावणे चार कोटी रुपयांचा कर थकवल्याने पालिका अधिकाऱ्यांनी ही मालमत्ता सील केली आहे.

Train Fare cut : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रेल्वे प्रवाशांना दिलासा! पॅसेंजर ट्रेनच्या भाड्यात थेट ५० टक्क्यांची कपात

पुणे महानगर पालिकेने शहरात थकबाकीदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यात अनेक बड्या प्रॉपर्टी आणि जागांवर कारवाई करण्यात आली आहे. यात अनेक मोठ्या व्यक्तिंचा देखील समावेश आहे. नीलेश राणे यांची पुण्यात डेक्कन येथे आर डेक्कन नावाची व्यावसायिक मालमत्ता आहे. या ठिकाणी फूड मॉल, चित्रपट गृह, तसेच अनेक व्यावसाईक गाळे आहेत. या मालमत्तेवरील पालिकेचा कर राणे यांनी थकवला आहे. या जागेवरतब्बल ३ कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची थकबाकी या जागेवर आहे. त्यामुळे पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई करत ही मालमत्ता सील केली आहे.

SC on ED : ईडीला कोणालाही समन्स बजवण्याचा अधिकार! त्याचा मान राखा; सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी

पुणे महानगर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहचले. त्यांनी ही मालमत्ता सील केली. या पूर्वी कर भरण्या संदर्भात नोटिसा देखील पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, नोटिस पाठवून देखील कर न भरल्याने पालिकेने मालमत्ता सील करत कारवाई केली आहे.

या संदर्भात नीलेश राणे म्हणाले, या कारवाईत काही गैर असल्याचे मला वाटत नाही. महापलिकेचे पैसे थकले म्हणून त्यांनी कारवाई केली. जर कारवाई नसती केली किंवा या जागेची थकबाकी भरली नसती तर वेगळी बातमी झाली असती. आता कारवाई झाली आहे. पालिकेची जी काही थकबाकी आहे ती आम्ही भरणार आहोत.

IPL_Entry_Point