Mumbra Murder Case : मुंब्रा येथे ९ जून रोजी आंबेडकर डोंगर येथे एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. या तरुणाचा खून झाला होता. त्याच्या या खुनाचा उलगडा मुंब्रा पोलिसांनी केला आहे. नशा करू नकोस असे सांगणाऱ्या मित्राचा राग आल्याने नशेडी मित्राने त्याच्या अल्पवयीन मित्राची हत्या केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे खबळल उडाली आहे. नशा करू नको असा मोलाचा सल्ला देणे मात्र, मित्राच्या जिवावर बेतले आहे.
मेहताब मंसुरी (वय १५) असे खून झालेल्या अल्पवयीन तरुणाचे नाव आहे. तर फैज सुलतान मलिक (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. मेहताब हा रेहान बाग येथे राहत होता. तो गेल्या ६ जूनपासून बेपत्ता होता. यामुळे त्याच्या आई वडिलांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात दिली होती.
दरम्यान, पोलिस मेहताब याचा शोध घेत असतांना ९ जून रोजी मुंब्रा बायपास रोडवर असणाऱ्या आंबेडकर डोंगरावर मेहताबचा मृतदेह सापडला होता. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. त्यामुळे त्याचा कुणीतरी खून केला असावा असा संशय पोलिसांना होता. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासात मेहताची मुंब्रा देवी पद येथे राहणाऱ्या फैज सुलतान मलिकशी ओळख असल्याचे पुढे आले. तपास करतांना ६ तारखेला मेहताब हा खेळायला जात असताना बाजारपेठेत फैज याला भेटल्याचे पोलिसांना कळले. त्यांनी फैज याला अटक घेतली. यावेळी त्याची चौकशी केली असता त्याने त्याचा खून केला असल्याची कबुली दिली.
सुलतान हा नशेच्या आहारी गेला होता. तो ६ जून रोजी आंबेडकर डोंगरावर नशा करण्यासाठी जात असतांना मेहताब मंसूरी त्याला भेटला. यावेळी मेहताबने देखील नशा करण्यासाठी सोबत यावे असे फैजने मेहताब याला म्हटले. यासाठी त्याने मेहताबच्या मागे तगादा लावला. त्याने मेहताबला जबरदस्तीने त्याच्या सोबत डोंगरावर नेले. डोंगराव जाताच फैजने नशा करण्यास सुरुवात केली. यावेळी मित्र म्हणून मेहताबने फैजला नशा करू नको असा सल्ला दिला. यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यातून राग अनावर झाल्याने मेहताबने फैजला नशा करत असल्याचे घरच्यांना सांगेन अशी धमकी दिली. आपले बिंग फुटेल या भीतीने आणि रागातून फैजने मेहताब याच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्याचा खून केला. फैज सुलतान याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
संबंधित बातम्या