मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar Railway news : पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी रुळावरून घसरली! सुरत-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Palghar Railway news : पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी रुळावरून घसरली! सुरत-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 28, 2024 06:49 PM IST

Goods train derail at palghar : पालघर रेल्वे यार्डात मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्याने मुंबई-सुरत मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे.

पालघर स्थानकात मालगाडी रुळावरून घसरली! मुंबई-सुरत मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत
पालघर स्थानकात मालगाडी रुळावरून घसरली! मुंबई-सुरत मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत (PTI)

Palghar goods train derails : पालघर यार्डात सायंकाळी पाचच्या सुमारास मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्यानं मुंबई-सुरत मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अपघातग्रस्त गाडी स्टीलच्या कॉइल घेऊन मुंबईच्या दिशेनं जात होती. पालघर रेल्वे स्थानकाजवळ ही मालगाडीचे शेवटचे सहा डबे घसरले आहेत. त्यात गार्डच्या डब्याचाही समावेश आहे. अपघातामुळं या मार्गावरील रेल्वे सेवेचा खोळंबा झाला आहे. मालगाडीच्या डब्यावर असणाऱ्या अवजड कॉईल लगतच्या लूप लाईन (स्लाइडिंग ट्रॅक) वर पसरल्यानं रेल्वे लाईन क्रमांक दोन, तीन व चार वरील सेवा ठप्प झाली आहे. त्याचवेळी या अपघातामुळं अप दिशेच्या विद्युत वाहिनीत बिघाड झाला आहे. त्यामुळं पुढील काही तास या मार्गावरील वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. मुंबईहून गुजरातकडं जाणारी वाहतूक मात्र कासवाच्या गतीनं सुरू असल्याचं समजतं.

टी-२० वर्ल्डकप २०२४