Air India flight News: एअर इंडियाने कोणतेही कारण न देता मुंबईहून सॅन फ्रान्सिस्को जाणाऱ्या विमानाच्या वेळापत्रकात बदल केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सुरुवातीला प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची सोय करून देण्याचे मान्य केले. सोमवारी दुपारी १.२५ मिनिटाने उड्डाण घेणारे विमान आज मंगळवारी सकाळी ९ वाजता आपला प्रवास निश्चित करेल.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी मुंबईहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणारे विमान एआय१७९ च्या वेळापत्रक बदलण्यात आला. ऑपरेशनल कारणांमुळे हे विमान मंगळवारी सकाळी ९ वाजता मुंबईहून प्रस्थान करेल. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.'
विमानाच्या वेळापत्रकात अचानक बदल केल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावा लागले.विमानाच्या वेळापत्रकात बदल झाल्याचे ग्राउंड स्टाफला माहिती नव्हती. अनेक प्रवाशांची कनेक्टिंग फ्लाइट होती. यामुळे ते सतत एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडून याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. अखेर काही तासानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी विमानाच्या वेळापत्रकात बदल झाल्याची माहिती दिली. केएलएम फ्लाइटच्या बुकिंगसाठी प्रवाशांना अतिरिक्त भाडे द्यावे लागले, हा खर्च कंपनी उचलेल, असे एमएनसीच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले.
एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, ही प्लाइट सोमवारी दुपारी १.२५ मिनिटांनी उड्डाण घेणार होती. मात्र, काही तास वाट पाहिल्यानंतर दुपारी ३.४५ मिनिटांनी फ्लाइटच्या वेळेत बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यावेळी हे विमान संघ्याकाळी ७ वाजता प्रस्थान करेल, असे सांगण्यात आले. परंतु, संध्याकाळी ५ वाजता विमान रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. ग्राउंड स्टाफला याबाबत कोणतीही माहिती नव्हती.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुंबई विमानतळावरील त्यांचे ग्राउंड स्टाफ संबंधित प्रवाशांना सर्व सहकार्य करत आहेत.'प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्ण परताव्यासह रद्द करण्याचे पर्याय किंवा दुसऱ्या तारखेला विनामूल्य पुनर्निर्धारित करण्याचे पर्याय देखील त्यांना ऑफर केले गेले आहेत. एअर इंडियामध्ये, आमचे ग्राहक आणि कर्मचारी यांची सुरक्षा आणि कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.' एअर इंडियाशी संबंधित अशीच घटना या वर्षी २४ मे रोजी घडली होती, जेव्हा मुंबई विमानतळावरून ३६ तासांच्या विलंबानंतर मुंबई-सॅन फ्रान्सिस्को विमानाने उड्डाण केले होते.