Mumbai Underground Metro : मुंबईची पहिली भुयारी मेट्रो जुलैमध्ये धावणार; जाणून घ्या मार्ग, स्थानके आणि वेळापत्रक!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Underground Metro : मुंबईची पहिली भुयारी मेट्रो जुलैमध्ये धावणार; जाणून घ्या मार्ग, स्थानके आणि वेळापत्रक!

Mumbai Underground Metro : मुंबईची पहिली भुयारी मेट्रो जुलैमध्ये धावणार; जाणून घ्या मार्ग, स्थानके आणि वेळापत्रक!

Updated Jun 25, 2024 02:43 PM IST

Mumbai First Underground Metro: मुंबई भुयारी मेट्रो प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गाड्यांचे स्थानके आणि वेळापत्रकाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंबईची पहिली भुयारी मेट्रो जुलैमध्ये धावणार
मुंबईची पहिली भुयारी मेट्रो जुलैमध्ये धावणार (Picture sourced from X)

Mumbai Underground Metro Route and Stations: शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो जुलैमध्ये सुरू होणार आहे. भुयारी मेट्रोचा ३३.५ किमीचा भाग आरे कॉलनीपासून सुरू होतो आणि तब्बल २७ रेल्वे स्थानकांचा प्रवास करतो. बोगद्याचा दुसरा टप्पा येत्या काही महिन्यांत सुरू होईल. दरम्यान, भुयारी मेट्रोचे स्थानके आणि वेळापत्रक जाणून घेऊयात.

मुंबई भुयारी मेट्रो स्थानके

मुंबईतील भुयारी मेट्रो प्रकल्पांतर्गत ५६ किलोमीटरलांबीच्या २७ ठिकाणांचा समावेश करण्यात येणार आहे. २६ स्थानके भुयारी असतील, अशी माहिती समोर आली. कफ परेड, विधानभवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल मेट्रो, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, सीतालादेवी, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रूझ, डोमेस्टिक एअरपोर्ट, सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ आणि आरे डेपो या स्थानकांचा समावेश आहे.

असे असेल वेळापत्रक

भुयारी मेट्रो सेवा सकाळी ६.३० वाजता सुरू होईल आणि रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहील.ताशी ९० किमी वेगाने धावणाऱ्या गाड्या दर काही मिनिटांनी प्रवाशांना उपलब्ध होतील.

मुंबई भुयारी मेट्रो प्रकल्पात डीएमआरसीचा सहभाग

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोच्या लाइन ३ च्या संचालन आणि देखभालीचे कंत्राट मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (डीएमआरसी) दिले आहे. ऑपरेशन कंट्रोल सेंटर, डेपो कंट्रोल सेंटर, स्टेशन्स, धावत्या गाड्या, गाड्या आणि मेट्रो यंत्रणेच्या सर्व पायाभूत सुविधांची देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करणे यासह मेट्रो मार्गाच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी डीएमआरसीवर असेल. एमएमआरसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, हे कंत्राट १० वर्षांसाठी देण्यात आले.

मुंबई कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्रीच्य हस्ते उद्घाटन

वरळी ते मरीन ड्राइव्ह ला जोडणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. कोस्टल रोड पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या प्रवासाचा वेळ निम्म्याहून कमी होईल. कोस्टल रोड प्रकल्पाचा दुसरा टप्पा म्हणजे मरीन ड्राइव्ह ते हाजी अली हा उत्तरेकडे जाणारा मार्ग ११ जूनपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर