(5 / 8)मिसिंग लिंकवर सर्वात उंच पूल आणि रुंद बोगदा बांधण्यात येत आहे. हा बोगदा अशीया खंडातील सर्वात मोठा आणि रुंद बोगदा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकदा लोकांसाठी उघडल्यानंतर या मिसिंग लिंकवरून प्रवास करण्यासाठी इतर कोणताही टोल भरावा लागणार नाही. प्रकल्पाची माहिती देताना, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता आणि प्रकल्प प्रमुख राकेश सोनवणे यांनी दिली. ते म्हणाले, "खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट हा सध्याचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सेक्शन १९.८ किमीचा आहे. जो आता १३.३ किमी होईल. या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचे अंतर ६ किमीने कमी होणार आहे. तर प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार आहे.