मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Pune Expressway News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आज सहा तास बंद; किती वाजेपासून किती वाजेपर्यंत? वाचा

Mumbai Pune Expressway News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आज सहा तास बंद; किती वाजेपासून किती वाजेपर्यंत? वाचा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 18, 2024 11:24 AM IST

Mumbai Pune Expressway Closed Today : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आज तब्बल सहा तास बंद राहणार आहे. पुण्याहून मुंबईकडं येणाऱ्या वाहतुकीला याचा फटका बसणार आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे आज सहा तास बंद
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे आज सहा तास बंद

Mumbai Pune Expressway Closed Today : पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे आज, १८ जानेवारी रोजी किमान सहा तास बंद राहणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळानं दिली आहे. सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहतूक चिखले रेल्वे ओव्हर ब्रिज इथं वाहतूक बंद राहणार आहे.

पनवेल-कर्जत दुहेरी मार्गावरील उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्यानं पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग बंद राहणार आहे. त्यामुळं पुण्याहून मुंबईकडं येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. बंद कालावधीत मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या हलक्या आणि अवजड सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन लिमिटेडनं दिली आहे. 

Vande Bharat news : प्रवास आरामदायी अन् वेगवान होणार! या वर्षी आणखी ६० ‘वंदे भारत’ सुरू होणार

वाहतुकीतील हे बदल ध्यानात घेऊन नागरिकांनी प्रवासाचं नियोजन करावं आणि गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर एक्स्प्रेस वेवरील नियमित वाहतूक पुन्हा सुरू होणार आहे.

असे आहेत पर्यायी मार्ग

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने ५५ किलोमीटर अंतर कापल्यानंतर मुंबई लेनमधून बाहेर पडू शकतात आणि मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून पुढं जाऊ शकतात.

पुण्याहून मुंबईकडं जाणारी हलकी वाहने आणि बसेस खोपोली एक्झिट जवळून बाहेर पडून पुढं मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून जाऊ शकतात.

पुण्याहून मुंबईकडे जाणारी सर्व वाहने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोलनाक्यावरील शेवटच्या लेनचा वापर करू शकतात. ही वाहने पुढं ३२.५०० किमीवर खालापूर एक्झिटकडे वळण घेऊ शकतात आणि खोपाली शेडुंग टोल प्लाझामार्गे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग ४८ वर येऊ शकतात.

Amrit Bharat : सर्वसामान्यांची लक्झरी ट्रेन म्हणून सुरू झालेली अमृत भारत एक्सप्रेस नेमकी आहे कशी?

पुण्याहून मुंबईकडे जाणारी सर्व वाहने पनवेल एक्झिटवरून वळण घेऊन मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग ४८ चा वापर करून करंजाडेमार्गे कळंबोलीला पोहोचू शकतील.

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग ४८ वर पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहने शेडुंग फाटा मार्गे पनवेलकडं वळवता येऊ शकतात.

WhatsApp channel