Mumbai-Pune express way : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या मार्गावर आता १०० ची वेगमर्यादा ओलंडल्यास थेट २ हजार रुपयांचा ऑनलाइन दंड आकरण्यात येणार आहे. यासाठी या मार्गावर प्रत्येक दोन किमी अंतरावर सीसीटीव्ही बसवण्यात आले असून या माध्यमांतून वेगाने जाणाऱ्या वाहनांनावर आता नजर ठेवली जाणार आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेसवे रोज हजारो वाहने जात असतात. यात कार, बस आणि अजवड वाहनांची संख्या मोठी आहे. या मार्गावर अनेक वाहने ही वेगमर्यादा पाळत नाहीत. या मार्गावर काही ठिकाणी १०० किमी पेक्षा आत वेगमर्यादा बंधनकारक आहे. मात्र, ही वेग मर्यादा पाळली जात नाही. उलट १०० किमी पेक्षा अधिक वेगाने ही वाहने चालवली जातात. यामुळे या मार्गावर आपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत.
दरम्यान, अशा बेजबादार वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी आता या मार्गावर सिसिटीव्ही बसवण्यात आले आहे. दर दोन किमी अंतरावर हे सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून या द्वारे १०० किमी पेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले जाणार आहे. येथे असणारी स्पीड गण वाहनांचा वेग तपासून १०० किमी पेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या वाहनचालकांना त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटवरुन थेट चलन पाठवणार आहेत. वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास त्यांना २ हजार रुपयांचा दंड होणार आहे. त्यामुळे या मार्गावर आता वेग मर्यादेचे बंधन पाळावे लागणार आहेत.
पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर सध्या गॅन्ट्री बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. या मार्गावरची वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाय योजना सुरू आहेत.