मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai-Nashik highway Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव ट्रकची कारला धडक; एकाचा मत्यू, तीन जखमी

Mumbai-Nashik highway Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव ट्रकची कारला धडक; एकाचा मत्यू, तीन जखमी

May 26, 2024 04:37 PM IST

Car-Truck Collision on Mumbai Nashik highway: मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली.

मुंबई-नाशिक महामार्गावर ट्रक आणि कारमध्ये अपघात झाला.
मुंबई-नाशिक महामार्गावर ट्रक आणि कारमध्ये अपघात झाला.

Mumbai-Nashik Highway Accident News: ठाणे जिल्ह्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर रविवारी पहाटे भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याची घटना उघडकीस आली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली येथे आज मध्य रात्री दीड वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त कार नाशिकच्या दिशेने जात असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने भिवंडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकचा नोंदणी क्रमांक असलेला ट्रक घसरून कारवर पडल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली. या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुंबईच्या सायन रुग्णालयाजवळ कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मुंबईच्या सायन रुग्णालय परिसरात भरधाव कारच्या धडकेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मृत महिला उपचार घेऊन घरी परत असताना हा अपघात घडला. या महिलेची महिलेची अद्याप पोलिसांना ओळख पटली नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोकमान्य टिळक म्यूनसिपल रुग्णालय (सायन रुग्णालय) परिसरात शुक्रवारी रात्री एक वृद्ध महिला बेशुद्ध अवस्थेत आढळल्याची पोलिसांना माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता महिलेचा मृत्यू झाल्याचे समजले. या महिलेच्या डोक्यावर आणि शरिरावर जखमा आढळून आल्यानंतर रस्ता अपघातात तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना संशय आला. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपासणी केली असता एक डॉक्टरच्या कारच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाल्याचे समजले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग