मुंबई- नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात; तीन जण जागीच ठार, १४ जण जखमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई- नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात; तीन जण जागीच ठार, १४ जण जखमी

मुंबई- नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात; तीन जण जागीच ठार, १४ जण जखमी

Jan 15, 2025 11:24 AM IST

Mumbai-Nashik Highway Accident: मुंबई- नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात घडल्याची घटना आज पहाटे घडली.

मुंबई- नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात; तीन जण जागीच ठार, १४ जण जखमी
मुंबई- नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात; तीन जण जागीच ठार, १४ जण जखमी

Mumbai-Nashik highway Accident News: मुंबई- नाशिक महामार्गावर आज (१५ जानेवारी २०२५) पहाटे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील आठ जणांची प्रकृती चिंतानजक आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मुंबई- नाशिक महामार्गावर शहापूर येथे आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास कंटेनर, ट्रक आणि खाजगी बससह पाच वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक महामार्गावर शहापूरातील गोठेघरजवळ हा भीषण अपघात घडला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, मालवाहतूक ट्रकला पाठीमागून येणाऱ्या चार वाहनांनी धडक दिली, असे सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. हा अपघातात पाचही वाहनाचे नुकसान झाले आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर