Mumbai-Mauritius Flight News: एअर मॉरिशसच्या मुंबई ते मॉरिशस फ्लाइट एमके ७४९ मधील अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. हे विमान आज पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास मुंबईहून मॉरिशस निघणार होत. यासाठी ३.४५ वाजता प्रवासी चढले. पण विमानाच्या इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली. या दरम्यान विमानाची एसी बंद असल्याने एक वृद्ध व्यक्ती आणि लहान बाळांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. प्रवाशांना खाली उतरण्याची परवानगी नव्हती, यामुळे त्यांना तब्बल ५ तास विमानातच थांबावे लागले. उड्डाण आता रद्द करण्यात आले असून इतर आवश्यक व्यवस्था केल्या जात आहेत.
एएनआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एअर मॉरिशसच्या मुंबई ते मॉरिशस फ्लाइट एमके ७४९ विमानातील एसी काम करत नसल्याने लहान मुलांसह आणि एका ७८ वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास होऊ लागला. एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइट रद्द करण्यात आली असून इतर आवश्यक व्यवस्था केल्या जात आहेत. या घटनेबाबत एअरलाइनकडून निवेदनाची प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या