Mumbai reverse vada pav viral News : सोशल मीडियावर रोज काहीना काही व्हायरल होत असतं. काही गोष्टीमुळे अनेकांचं मनोरंजन होत तर काही जणांच याचा त्रास होतो. सध्या इंटरनेटवर मुंबईकरांच्या लाडक्या वडापावचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून अनेक मुंबईकरांनी संताप व्यक्त केला आहे. वडापावचा हा फोटो व्हायरल होतो आहे.
वडापाव हा मुंबईकरांचा आवडता खाद्यपदार्थ. वडापाव खाऊन अनेक जण उदरनिर्वाह करत असतात. या वडापावला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. अशा या मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या वडापाव सोबत एकाने प्रयोग केला आहे. हा प्रयोग अनेक मुंबईकरांना आवडलेला नाही. खरं तर मुंबईतील एका व्यक्तीने त्याच्या रेस्टॉरंटमध्ये वडापावचा मेनू ठेवला. मात्र, हा वडापाव तयार करतांना त्याने त्यात काही बदल केले. वडापावमध्ये बटाट्याचा वडा हा एका पावाचे दोन भाग करून त्या मधल्या भागात चटणी टाकून त्यात बटाटावडा ठेऊन दिला जातो. मात्र, या हॉटेल मालकाने काही वेगळचं केलं आहे, जे मुंबईकरांना रुचलेलं नाही. या व्यक्तिने वडा हा दोन पावमध्ये देण्याएवजी एक मोठा पाव तयार करत, त्याच्या खोलगट भागात तो ठेवला आहे. तसेच त्याने या वडापावला रिव्हर्स वडापाव असं नाव दिलं. या रिव्हर्स वडापावचा फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. अनेकांनी या फोटोवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोमध्ये एक मोठा तळलेला बटाटेवडा पावाच्या वर ठेवलेला दिसत आहे. रेस्टॉरंटमध्ये या डिशच्या तळाशी असलेल्या टॅगनुसार याची किंमत १९० रुपये ठेवण्यात आली आहे.
हा फोटो पाहताच लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. या फोटोवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले की, आपल्या पूर्वजांनी मोठ्या कष्टाने केलेली प्रगती निर्दयीपणे नष्ट केली जात आहे. आणखी एका युजरने यावर कमेंट करत लिहिले की, काय गंमत आहे... त्याने जे बनवले आहे ते चुकीचं तयार केलं आहे. अहो भाऊ, आम्ही आधीच्या वडापाववर खूश आहोत. एका युजरने लिहिले की, हे काय आहे ? तर दुसऱ्या युजरने लिहिले की, तुम्ही वडापावच्या नावाखाली काय देत आहात? अनेकांनी याला मूळ गोष्टीची अतिशय वाईट प्रत म्हटले, तर अनेकांनी लिहिले की, या राक्षसी गोष्टीबंद करा असे म्हटलं आहे. एका युजरने लिहिले की, तुम्ही वडापावची जी अवस्था केली आहे ती पाहून मुंबईकर खूप संतापले आहेत.
संबंधित बातम्या