
Mumbai Records hottest day : राज्याच्या हवामानात मोठे बदल झाले आहेत. थंडी गायब झाली असून तापमान वाढले आहे. तर पावसाची शक्यता देखील वर्तवली जात आहे. फेंगल चक्रीवादळामुळे हा परिमाण झाला असल्याचे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, या वातावरण बदलात बुधवार हा सर्वाधिक उष्ण दिवस ठरला. गेल्या १६ वर्षातील सर्वाधिक तापमान बुधवारी नोंदवले गेले. बुधवारी ३७.३ अंश डिग्री सेल्सिअस तपमानाची नोंद झाली.
मुंबईत बुधवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ वेधशाळेने कमाल तापमान ३७.३ अंश सेल्सिअस नोंदवले. भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा हवामान केंद्रात ३५ अंश डिग्री सेल्सिअस तपमानची नोंद झाली. हे तापमान यापूर्वी डिसेंबरमध्ये नोंदवण्यात आलेले सर्वाधिक तापमान ठरले. मुंबईत एवढे तापमान ५ डिसेंबर २००८ मध्ये नोंदवले गेले होते. त्यावेळी मुंबईत ३७.७ अंश सेल्सिअस तापमान होते. दरम्यान, फेंगल चक्रीवादळामुळे दक्षिणेकडून येणारे वारे मुंबच्या दिशेने येत असून यामुळे तापमानात वाढ होत असल्याचं दिसत आहे. पुढील चार ते पाच दिवस मुंबईकांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. भारतीय हवामान विभागने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी नोंदवले गेलेले तापमान गेल्या १६ वर्षातील सर्वाधिक तापमान होते. बुधवार हा उष्ण दिवस होता.
मुंबई हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर म्हणाल्या, गेल्या आठवड्यात २९ नोव्हेंबर रोजी मुंबईचे किमान तापमान १६.५ अंश सेल्सिअस होते. जे गेल्या आठ वर्षांतील नोव्हेंबरमधील सर्वात कमी तापमान होते. तर बुधवारी सर्वाधिक तापमान नोंदवल्या गेले जे १६ वर्षातील सर्वाधिक तापमान होते.
चक्रीवादळामुळे दक्षिणेकडून येणारे वारे मुंबईचे तापमान कमी होऊ देत नाहीत. त्यात आज राज्यात काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगिली, कोल्हापूर सह कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
