मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Heatwave: मुंबईकरांनो काळजी घ्या! आठवड्याभरात तापमान ४२ सेल्सिअसपर्यंत पोहोचणार

Mumbai Heatwave: मुंबईकरांनो काळजी घ्या! आठवड्याभरात तापमान ४२ सेल्सिअसपर्यंत पोहोचणार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 17, 2024 05:26 PM IST

Mumbai Temperature Today: मुंबईत पुढच्या आठवड्यात उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Heatwave alert in Mumbai
Heatwave alert in Mumbai (Pixabay )

Mumbai Weather Updates: गुलाबी थंडीचा आनंद लुटल्यानंतर मुंबईकरांना आता उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.येत्या आठवडाभरात मुंबई आणि आजूबाजूच्या भागात तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूझमध्ये येत्या गुरुवारपर्यंत तापमान ३७-३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. तर, शहरातील काही भागात तापमान ४१- ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

या आठवड्यात कल्याण, बदलापूर ४१-४२ अंश सेल्सिअस, ठाणे, मुलुंड ४१ अंश सेल्सिअस आणि पनवेल- नवी मुंबई येथे ४० अंश सेल्सिअस तापमानासह इतर भागातही उन्हाचा कडाका जाणावणार आहे. पश्चिम भागात तापमान ३७-३८ अंश सेल्सिअस असण्याची अपेक्षा आहे. दादरमध्ये ३५- ३६ अंश सेल्सिअस आणि दक्षिण मुंबईत ३४ अंश सेल्सिअस तापमान असेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मुंबईतील आजचे किमान तापमान २३ अंश सेल्सिअसने सुरू झाले. तर, कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दिवसभर तापमान २५ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत सध्या ७.९४ किमी/ताशी वेगाने वारे वाहत आहेत. अधूनमधून वारे ११.१ किमी/तास पर्यंत पोहोचत आहेत. सूर्य आज सकाळी अंदाजे ६.४५ मिनिटांनी उगवला आणि संध्याकाळी ६.४९ वाजताच्या सुमारास मावळेल.

 

मुंबईतील तापमानात बदल होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होताना दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे रहिवाशांना हायड्रेटेड राहण्याचा आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

WhatsApp channel