Mumbai-Goa highway News: मुंबई गोवा महामार्गावर सलग तीन दिवसांचा (११ जुलै-१३ जुलै) ब्लॉक घेतला जाणार आहे. कोलाड जवळील पूई येथे नवीन पूलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हे ब्लॉक घेतला जाणार आहे.महत्त्वाचे म्हणजे, हा ब्लॉक सकाळी ६-८ वा. आणि दुपारी २-४ वा. अशा दोन टप्प्यात असणार आहे. वाहतूक विभाग अप्पर महासंचालकांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे या कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या आणि गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या वाहानांसाठी पर्यायी मार्ग कोणते? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे गेल्या १२ वर्षांपासून रखडले. रंदीकरण पूर्ण झाले असले तरी कासू ते इंदापूर टप्प्यातील पूलांची कामे रखडली आहेत. ही कामे आता मार्गी लावली जाणार आहे. याच कामाचा भाग म्हणून कोलाड जवळील पूई येथील नवीन पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या पुलाच्या कामादरम्यान वाहतूक बंद ठेवणे गरजेचे असल्याने मुंबई - गोवा महामार्गावर तीन दिवस चार तासांचे ब्लॉक घेण्यात आला आहे. याकाळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक बंद ठेवली जाणार असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे. वाहतूक विभाग अप्पर पोलीस माहसंचालक कार्यालयातील पोलीस अधिक्षक अरविंद साळवे याबाबतची वाहतूक प्रतिबंधात्मक अधिसूचना मंगळवारी उशीरा जारी केली आहे.
- वाकण फाटा येथून भिसे खिंड-रोहा- कालाड मार्गे.
- वाकण फाटा येथून पाली-रवाळजे-कोलाड मार्गे किंवा पाली-रवाळजे- निजामपुर-माणगांव मार्गे.
- खोपोली, पाली, रवाळजे, निजामपूर, माणगाव मार्गे.
- कोलाड येथून कालाड-रोहा-भिसे खिंड- वाकण फाटा मार्गे
- कोलाड येथून रवाळजे-पाली वरून वळवून वाकण- पाली- खोपोली राष्ट्रीय महामार्गे
- कोलाड येथून रवाळजे-पाली-वाकण फाटा वरून वळवून मुंबई गोवा महामार्गे
महत्त्वाचे म्हणजे, हा ब्लॉक तीन दिवसांत अवघ्या चार तासांसाठी असेल. इतर वेळेत मुंबई- गोवा महामार्ग वाहतुकीसाठी खुला असेल, याची वाहनचालकांनी नोंद घ्यावी.
संबंधित बातम्या