मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Accident: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ३ जण ठार
Two Wheeler Accident
Two Wheeler Accident (HT)

Accident: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ३ जण ठार

26 May 2023, 20:40 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Mumbai-Ahmedabad National Highway Accident: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कार आणि दुचाकीमधील अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

Road Accident: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर, एकाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सुनिल वाडकर (वय २४), किशोर कांबडी (वय २०) विक्रम कांबडी (वय २४) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही दुचाकीवरुन कामावर जात होते. सुत्रकार फाट्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. तर, एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारदरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघातातील तीनही मृत तरुण बारीमाळ आदिवासी पाड्यातील रहिवासी असल्याचे कळते.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

विभाग