Youth Donor: मुंबईतील तरुणाने वाचवले ब्लड कॅन्सरग्रस्त रुग्णाचे प्राण; रक्तातील स्टेम सेल केल्या दान-mumbai youth donates his blood stem cells to cancer patient ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Youth Donor: मुंबईतील तरुणाने वाचवले ब्लड कॅन्सरग्रस्त रुग्णाचे प्राण; रक्तातील स्टेम सेल केल्या दान

Youth Donor: मुंबईतील तरुणाने वाचवले ब्लड कॅन्सरग्रस्त रुग्णाचे प्राण; रक्तातील स्टेम सेल केल्या दान

Sep 29, 2022 02:56 PM IST

महाराष्ट्रातील १०००० हून अधिक लोकांची डिकेएमएस बीएएसटी स्टेम सेल रजिस्ट्रीमध्ये संभाव्य ब्लड स्टेम सेल दाता म्हणून नोंदणी झाली आहे.

<p>ब्लड स्टेम सेल दाता&nbsp;</p>
<p>ब्लड स्टेम सेल दाता&nbsp;</p>

मुंबईतील रहिवासी केविनने रक्ताच्या कर्करोगाच्या रुग्णाला स्टेम सेलचं दान करून प्राण वाचवण्यास मदत केली. केविनने जानेवारी २०२१ मध्ये डीकेएमएस बीएमएसटी फाउंडेशन इंडियामध्ये नोंदणी केली होती आणि अवघ्या वर्षभरातच त्याला एक जीव वाचवण्याची संधी मिळाली. रक्त कर्करोग, थॅलेसेमिया आणि ऍप्लास्टिक ॲनिमिया यांसारख्या रक्त विकारांविरुद्धच्या लढ्यासाठी समर्पित एक ना-नफा संस्था, डिकेएमएस बीएमएसटी फाऊंडेशन इंडिया (DKMS BMST Foundation India) द्वारे त्याच्या बहिणीच्या महाविद्यालयात आयोजित रक्तदाता नोंदणी मोहिमेदरम्यान केविन संभाव्य ब्लड स्टेम सेल दाता म्हणून नोंदणीकृत होते आले.

प्रेरणादायी प्रवासाविषयी बोलताना केविन म्हणतो, “ज्यावेळी मला कळले की रुग्णासाठी मी एक परिपूर्ण मॅच आहे तेव्हा माझ्यासाठी हा खरोखरच आनंदाचा क्षण होता. माझ्या काही दिवसांच्या त्रासाच्या मोबदल्यात कोणाला जीव मिळत असेल तर यापेक्षा चांगले काय असू शकते. अनेकदा आपल्याजवळ जे आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ नसतो, परंतु असे लोक असतात ज्यांना जीवनाच्या साध्या सध्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. मी निश्चितपणे अधिकाधिक लोकांना विशेषतः तरुणांना पुढे येण्यासाठी आणि डोनर म्हणून नोंदणी करण्यास प्रोत्साहित करेन. आपल्याकडील एक छोटासा भाग एखाद्यासाठी जीवन रक्षक ठरू शकतो. डिकेएमएस बीएमएसटी ने मला दिलेल्या समर्थनामुळे मी खूप प्रभावित झालो आणि त्यांनी प्रक्रिया शक्य तितकी शांत आणि सुरळीत केली."

महाराष्ट्रातील १०००० हून अधिक लोकांची डिकेएमएस बीएएसटी स्टेम सेल रजिस्ट्रीमध्ये संभाव्य ब्लड स्टेम सेल दाता म्हणून नोंदणी झाली आहे आणि संपूर्ण भारतभर ७०००० हून अधिक लोक नोंदणीकृत आहेत. फाऊंडेशनने गेल्या तीन वर्षांत संपूर्ण भारतात ७० ब्लड स्टेम सेल प्रत्यारोपणाची सोय केली आहे.

संबंधित बातम्या